मुंबई : 1 एप्रिलपासून एलपीजी सिलिंडरची किंमत (LPG Price) प्रति सिलिंडर 10 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. यामुळे कोट्यावधी ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. सरकार यापुढे किंमती कमी करेल की नाही, हे सरकारच सांगू शकेल, पण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, तुम्हाला केवळ 9 रुपयांत 809 रुपयांचा सिलिंडर कसा मिळू शकेल.
एलपीजी बुकिंग आणि पेमेंटवर पेटीएमने (Paytm) आपल्या ग्राहकांना बम्पर ऑफर दिली आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना केवळ 9 रुपयांमध्ये 809 रुपयांचे गॅस सिलिंडर मिळू शकेल. पेटीएमने कॅशबॅक ऑफर सुरू केली आहे. या कॅशबॅक ऑफर अंतर्गत जर एखादा ग्राहक गॅस सिलिंडर बुक करत असेल तर त्याला 800 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकेल.
तुम्हालाही पेटीएमच्या या ऑफरचा फायदा घ्यायचा असेल तर 30 एप्रिल 2021 पर्यंत ही ऑफर आहे. या ऑफर्स केवळ अशाच ग्राहकांसाठी आहेत जे प्रथमच एलपीजी सिलिंडर पेटीएमद्वारे बुक करतील आणि पेटीएमने पैसे देतील. जेव्हा आपण एलपीजी सिलिंडर बुक कराल आणि पैसे द्याल तेव्हा तुम्हाला ऑफर अंतर्गत एक स्क्रॅच कार्ड मिळेल, ज्याची कॅशबॅक प्राइज 800 रुपये पर्यंत असेल. पहिल्या एलपीजी सिलिंडरच्या बुकिंगवर ही ऑफर आपोआप लागू होईल.
कॅशबॅकसाठी तुम्हाला स्क्रॅच कार्ड खोडावे लागेल, जे तुम्हाला बिल भरल्यानंतर मिळेल. कॅशबॅकची रक्कम 10 ते 800 रुपयांपर्यंत असू शकते. आपल्याला हे स्क्रॅच कार्ड 7 दिवसांच्या आत उघडावे लागेल, त्यानंतर तुम्ही हे वापरण्यास सक्षम राहणार नाही.
तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ इच्छित असल्यास प्रथम तुमच्या मोबाइल फोनमध्ये पेटीएम अॅप डाउनलोड करावा लागेल. यानंतर तुमच्या गॅस एजन्सीमार्फत सिलिंडर बुकिंग करावे लागेल. त्यासाठी पेटीएम अॅपमध्ये Show Moreवर क्लिक करा, त्यानंतर रिचार्ज (Recharge) आणि पे बिलेवर (Pay Bills) क्लिक करा.
यानंतर, आपल्याला सिलेंडर बुक ( book a cylinder ) करण्याचा पर्याय दिसेल. येथे, आपली गॅस ऍजेसी कंपनी निवडा. बुकिंग करण्यापूर्वी, तुम्ही FIRSTLPG एलपीजीचा प्रोमो कोड प्रविष्ट करावा लागेल. बुकिंगच्या 24 तासांच्या आत तुम्हाला कॅशबॅक स्क्रॅच कार्ड मिळेल. हे स्क्रॅच कार्ड 7 दिवसांच्या आत वापरावे लागेल.