आता मोबाईलवरुन विना नेटवर्क कॉल; जाणून घ्या कसं

आता यूझर्स त्यांच्या मोबाईलवरुन नेटवर्कशिवाय इतर कोणत्याही नंबरवर कॉल करण्यास सक्षम असतील. हे कसं शक्य आहे?

Updated: Apr 3, 2021, 09:19 PM IST
आता मोबाईलवरुन विना नेटवर्क कॉल; जाणून घ्या कसं title=

मुंबई : मोबाईलला अनेकदा नेटवर्क नसल्यामुळे, लोकांना कॉल करण्यासाठी समस्या येत असतात. परंतु आता तुम्हाला या समस्येचा सामना करावा लागणार नाही. आता यूझर्स त्यांच्या मोबाईलवरुन नेटवर्कशिवाय इतर कोणत्याही नंबरवर कॉल करण्यास सक्षम असतील. हे कसं शक्य आहे? कसं ते जाणून घ्या

बरेच टेलिकॅाम ऑपरेटर त्यांच्या यूझर्सना वाय-फाय कॉलिंग सुविधा देत आहेत, ज्याच्या मदतीने नेटवर्कशिवाय देखील तुम्ही कॉलिंग करु शकता. ऍन्ड्रॉइड (Android) आणि आयओएस (iOS) ऑपरेटर असणाऱ्या अनेक फोनमध्ये हे इनबिल्ट फिचर उपलब्ध असतात, फक्त ते ऍक्टीव्हेट करावे लागेल.

iPhone वर वाय-फाय कॉलिंग कसे करावे

आयफोन यूझर्सने आधी फोनच्या सेटींगमध्ये जावे लागेल. त्यानंतर चेक व्हाय-फाय कॉलिंग वर क्लिक करा. येथे आपल्याला व्हायफाय कॉलिंग चालू करावे लागेल. यानंतर, आपल्याला बॅक करुन मागील स्क्रिनवर जावे लागेल. तेथे तुम्हाला 'अन्य डिव्हाइस' वर क्लिक करावे लागेल. यानंतर, तुम्हाला इतर फोनसाठी या फिचरला चालू करावे लागेल.

Android फोनवर व्हायफाय कॉलिंग कसे करावे

Android यूझर्सना प्रथम नेटवर्क सेटिंग्ज वर जावे लागेल नंतर,  इंटरनेट चेक करावे लागेल आणि नंतर व्हायफाय कॉलिंग तपासावे लागेल. तुम्हाला तुमच्या टेलिकॉम ऑपरेटरने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागेल. यानंतर, तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर व्हायफाय कॉलिंग सुरु करू शकता.

या प्रकरणाची विशेष काळजी घ्या

हे फिचर सुरु होताच आपण मोबाईलवरुन विना नेटवर्क कॉल करू शकता. यासाठी, आपला फोन व्हाय-फायशी कनेक्ट केलेला असावा. आपण ग्राहक सेवेशी बोलून देखील या विषयी माहिती मिळवू शकता.

या कंपन्याकडून व्हायफाय कॉलिंगची सुविधा

सध्या एयरटेल, जिओ, व्होडाफोन-आयडिया आपल्या यूझर्सना मोफत व्हायफाय कॉलिंग सुविधा देत आहे. यासाठी आपल्याला कोणतेही ऍप डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही. बीएसएनएल  यूझर्सना वायफाय कॉलिंग करण्यासाठी विंग्स अॅप डाउनलोड करावे लागेल आणि सेवेसाठी 1099 रुपये नोंदणी शुल्क देखील भरावे लागेल.