मुंबई : सॅमसंग इंडियाने AX5500 एअर प्योरिफायर लॉंच केला. यातील एरोडायनॅमिक टेक्नोलॉजीमुळे हा लिव्हिंग स्पेस तात्काळ प्योरिफाइड करतो असे कंपनीतर्फे सांगण्यात येतयं. सॅमसंग AX5500 ची किंमत 34 हजार 990 रुपये असून को ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोर्सवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. याची खरेदी करणाऱ्या ग्राहकाला सॅमसंग गॅलेक्सी j6 (32 जीबी) स्मार्टफोनदेखील मिळणार आहे. याची किंमत साधारण 12 हजार 990 रुपये आहे. सॅमसंग एअर प्योरिफायर AX5500 किंवा सॅमसंग प्रिमियम एअर प्योरिफायर AX7000 वर 13 हजाराचा स्मार्टफोन फ्री मिळतोय.
सॅमसंग एअर प्योरिफायर AX5500 समोरुन हवेला आत खेचतो. आपल्या 4 स्टेप प्योरिफायर सिस्टिमने सर्वात लहान धुळीचे कण, गॅस आणि त्रासदायक व्हायरस नष्ट होतात.
यात ड्युयल स्मार्ट सेंसर असून तो रियल टाइममध्ये एअर क्वालिटी डिटेक्ट करतो. याशिवाय यामध्ये एअर डिजिटल डिस्प्ले आहे ज्यावर गॅस फ्लूशनची लेवल पाहता येऊ शकते.
यामध्ये लावलेल्या फिल्टरच्या मदतीने तुम्ही पुढचा फिल्टर कधी लावू शकता याबद्दलही तुम्हाला समजणार आहे. हा प्योरिफायरची कुठेही तुम्ही हालचाल करु शकता. सर्व कोपऱ्यात व्यवस्थित बसेल अशा पद्धतीने याला डिझाइन केलं गेलंय.