सॅमसंगचा सर्वात स्वस्त ड्युअल रिअर कॅमेरा फोन लॉन्च, किंमत फक्त...

स्मार्टफोन प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंगने भारतीय बाजारपेठेत आपला नवा स्मार्टफोन Samsung Galaxy J7 Duo लॉन्च केला आहे. पाहूयात या फोनची किंमत, फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स काय आहेत...

Updated: Apr 12, 2018, 06:28 PM IST
सॅमसंगचा सर्वात स्वस्त ड्युअल रिअर कॅमेरा फोन लॉन्च, किंमत फक्त... title=

मुंबई : स्मार्टफोन प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंगने भारतीय बाजारपेठेत आपला नवा स्मार्टफोन Samsung Galaxy J7 Duo लॉन्च केला आहे. पाहूयात या फोनची किंमत, फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स काय आहेत...

सॅमसंग कंपनीने आपला Galaxy J7 Duo हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या फोनची खास बाब म्हणजे यामध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आणि अँड्रॉईड ओरियो आहे. हा सॅमसंग कंपनीचा सर्वात स्वस्त ड्युअल कॅमेरा सेटअप असलेला स्मार्टफोन आहे.

Galaxy J7 Duo चा कॅमेरा 

या स्मार्टफोनमध्ये रियर ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्यामध्ये 13 MP चा प्रायमरी सेंसर आणि 5 MP चा सेकंडरी  सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी फोनमध्ये 8 MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. सर्व कॅमेऱ्याला सेंसर्स f/1.9 अॅपेर्चर सपोर्ट करतं. सॅमसंगने केलेल्या दाव्यानुसार, याचा उपयोग लो-लाईटमध्ये चांगली फोटोग्राफी करण्यासाठी करता येऊ शकतो.

इतर स्पेसिफिकेशन्स

या फोनमध्ये 5.5 इंचाचा एचडी सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये 1.6GHz ऑक्टा-कोअर SoC सोबत 4 GB रॅम आणि 32 GB स्टोरेज देण्यात आला आहे. हा स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या सहाय्याने 256 GB पर्यंत वाढवता येऊ शकतो.

फोनची सुरक्षितता

फोनमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने होम बटनवर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आलं आहे. यामध्ये फेस अनलॉक फिचरही उपलब्ध आहे. स्मार्टफोनच्या पॉवर बॅकअपसाठी 3000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच फोनमध्ये एक नवं फिचर देण्यात आलं आहे ज्याचं नाव अॅप पेयर बिल्ट-इन असं आहे. याचा वापर करुन दोन अॅपवर एकाच वेळेस काम करता येऊ शकतं.

Galaxy J7 Duo ची किंमत

सॅमसंगने लॉन्च केलेल्या Galaxy J7 Duo या फोनची किंमत 16990 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन ब्लॅक आणि गोल्ड या रंगांत उपलब्ध आहे.