मुंबई : शशी थरुर यांनी आपल्या फोटोला ‘डॉगी फिल्टर’ वापरुन ट्विटरवर पोस्ट करुन ट्रोलर्सना आव्हान दिलं आहे. पण या फोटोमुळे ते स्वत: अडचणीत आले आहेत. कारण यावरून शशी थरुर यांच्या या फोटोवर नेटिझन्सनी त्यांच्या चांगलीच टीका केली आहे.
‘एआयबी’ने मोदींच्या फोटोवर स्नॅपचॅटवरच ‘डॉगी फिल्टर’ लावून त्यांच्या फोटोची खिल्ली उडवली होती. यानंतर नेटिझन्सनी यावर आक्षेप घेतल्यानंतर मुंबई पोलिसांनी ‘एआयबी’विरोधात गुन्हा दाखल केला.
याचा निषेध करत काँग्रेस नेते शशी थरुर यांनीही ‘डॉग फिल्टर’ वापरला आहे. पण यामुळे त्यांना नेटिझन्सच्या रागाला सामोरे जावे लागणार आहेत, ट्रोल करणारे राजकीय कार्यकर्ते असल्याची चर्चा देखील सोशल मीडियावर आहे.