Tata Punch Sales: ऑटो क्षेत्रात अनेक कंपन्या असून एकापेक्षा एक वरचढ गाड्या लाँच करत आहेत. त्यामुळे ऑटो क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. असं असलं तरी मारुति सुझुकीच्या गाड्यांना मोठी मागणी आहे. मारुति सुझुकीने ब्रेझा एसयूव्ही फेसलिफ्ट वर्जन लाँच केलं होतं. त्यानंतर विक्रीत झपाट्याने वाढ झाली. नोव्हेंबर 2022 मध्ये ब्रेझा टॉप 10 यादीत असून दहाव्या क्रमांकावर आहे. या गाडीच्या 11324 युनिट्सची विक्री झाली होती. तर टाटा पंच या क्रमवारीत नवव्या स्थानावर असून 12131 युनिट्सची विक्री झाली आहे. आकडेवारी पाहता टाटा पंचनं मारुति सुझुकी ब्रेझाला मागे टाकल्याचं दिसत आहे. टाटा पंच लाँच होऊन फक्त एक वर्ष पूर्ण झालं आहे. इतक्या कमी वेळात टाटा पंचला ग्राहकांची पसंती मिळाली आहे.
टाटा पंचची किंमत 6 लाख रुपये ते 9.54 लाखापर्यंत जाते. ही गाडीची एक्स-शोरुम किंमत आहे. यात प्युअर, अॅडवेंचर, अकंप्लिश्ड आणि क्रिएटिव्ह हे चार व्हेरियंट आहेत. या व्यतिरिक्त काजिरंगा आणि कॅमो एडिशन लाँच केलं आहे. या गाडीमद्ये 366 लीटरची बूट स्पेस आहे. यात 1.2 लीटर पेट्रोल इंजिन असून 86 पीएस पॉवर आणि 113 एनएम टॉर्क जनरेट करते. यात 5 स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गियरबॉक्स ऑप्शन येतं. ही गाडी 18.97 किमी प्रति लिटरपर्यंत मायलेज देऊ शकते.
बातमी वाचा- Gravton Quanta इलेक्ट्रिक बाइकची चर्चा, 80 रुपयांमध्ये धावणार 800 किमी
या गाडीमध्ये 7.0 टचस्क्रिन सिस्टम, सेमी डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, ऑटो एसी, ऑटोमेटिक हेडलाइट्स आणि क्रूझ कंट्रोल फीचर्सचा समावेश आहे. यात ड्यूअल फ्रंट एअरबॅग, ईबीडीसह एबीएस आणि रियर पार्किंग कॅमेरापण येतो. याबाबत ब्रेझा या गाडीपेक्षा वरचढ ठरते. तुलनेत ब्रेझामध्ये चांगले फीचर्स असून इंजिनही मोठं आहे. मात्र ब्रेझाची किंमत अधिक आहे.