मुंबई : टेक इंडस्ट्रीबद्दल दररोज नवीन नवीन बातम्या येतच असतात. दररोज एक नवीन डिव्हाइस लाँच, नवीन टीव्ही किंवा रेफ्रिजरेटरवर ऑफर, अॅप अपडेट किंवा फेसबुक आणि व्हॉट्सअॅपशी संबंधित बातम्या दिवसभर सुरूच आसतात. शनिवारी देखील भरपूर टेकच्या बातम्या समोर आल्या. अशा परिस्थितीत जर तुम्हा काही मिस केले असेल किंवा तुम्ही यापासून वंचीत असाल तर, काळजी करू नका, आम्ही यासगळ्या बातम्यांची थोडक्यात माहिती तुम्हाला देणार आहोत.
भारतात कोविड -19 प्रकरणांच्या वाढीमुळे Amazon इंडियाने आपले वार्षिक प्राइम डे सेल (Prime Day Sale) भारतात रद्द केले आहे. कोविड -19 च्या दुसर्या लाटेमुळे भारतात खूप जास्त संक्रमित रुग्ण संख्या वाढली आहे.
या विषाणूमुळे 4 लाखाहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे, तर हजारोंचा मृत्यू झाला आहे. वाढत्या केसेसमुळे देशातील रुग्णालयांमध्ये बेड्स आणि ऑक्सिजन सिलिंडरचीही कमतरता आहे. दरम्यान, अॅमेझॉन, गुगलसह मोठ्या तंत्रज्ञानाच्या कंपन्यांनी वैद्यकीय उपकरणे आणि अन्य मदतीसह देशाला आपला पाठिंबा दिला आहे.
128 मिलियन (12.8 कोटी) आयओएस यूजर्स "XcodeGhost" नावाच्या धोकादायक मालवेयरमुळे प्रभावित झाले आहेत. हे मालवेअर 2015 मध्ये प्रथम उघडकीस आले यामुळे अॅप स्टोअरवर अपलोड केलेल्या iPhone आणि iPad च्या बर्याच अॅप्सवर परिणाम झाला.
Epic Games आणि Apple वर सुरू असलेल्या चाचणी दरम्यान, Appleच्या ईमेलमध्ये असे दिसून आले की, 128 मिलियन यूझर्सने 2 हजार 500 असे अॅप्स डाउनलोड केले जे मालवेयरमुळे प्रभावित झाले आहेत आणि ते Xcode च्या बनावट कॅपीमुळे आले आहे.
डिफेंस रिसर्च एंड डेवलपमेंट ऑर्गनाइजेशन (DRDO) आणि सेंटर फॉर आर्टिफिशियल इंटेलिजेंस एंड रोबोटिक्स (CAIR) ने कोविड 19 पासून प्रभावित झालेल्या रूग्णांबद्दल जाणून घेण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) अल्गोरिदम विकसित केला आहे. यामध्ये छातीच्या एक्स-रेवरून समजते की, समोरील व्यक्ती कोविड -19 संक्रमित आहे की नाही.
डेवलपर्सच्या म्हणण्यानुसार, या साधनाचे नाव Atman AI असे आहे. जे छातीच्या एक्स-रे स्क्रीनिंगसाठी वापरले जातात आणि त्याच्या अचूकतेचे प्रमाण 96.73 टक्के आहे.
Google अॅपने एक नवीन फीचर आणण्याची घोषणा केली आहे. ज्यामध्ये अॅप्स कोणता डेटा एकत्रित करत आहेत किंवा वापरत आहेत हे यूझर्सना कळेल. हे वैशिष्ट्य 2022 मध्ये लाँच केले जाईल.
अॅप कोणत्या प्रकारचा डेटा जमा करतो, तो कसा संग्रहित केला जातो आणि तो कसा वापरला जातो याबद्दल माहिती समाविष्ट करण्यासाठी Google नवीन अॅप सबमिशन आणि अॅप अपडेट बाजारात आणणार आहे.