नवी दिल्ली : मोबाईल नंबर पोर्ट करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.
ट्रायने मोबाईल नंबर पोर्टेबिलीटी(एमएनपी)चे दर ३१ जानेवारीला जवळपास ७९ टक्के घटवून अधिकतम चार रूपये केलेत. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायने कंपन्यांना निर्देश दिले की, प्रत्येक यशस्वी पोर्टिंगसाठी लागणारं शुल्क १९ रूपयांवरून घटवून आता चार रूपये करा.
त्यासोबतच सांगण्यात आले आहे की, सर्वच दूरसंचार कंपन्या एमएनपीसाठी यापेक्षाही कमी शुल्क घेण्यासाठी स्वतंत्र आहेत. उल्लेखनिय बाब म्हणजे एमएनपी शुल्क दरांच्या समीक्षेसाठी प्रक्रिया घेणे डिसेंबरपासून सुरू केले होते. हे नवे दर घोषनेनंतर लगेच लागू होतील. दूरसंचार कंपन्या म्हणाल्या की, यामुळे त्यांच्यावरील एमएनपीचं ओझं कमी होईल.
काऊंटरप्वॉईंट रिसर्चने बुधवारी(३१ जानेवारी) म्हटले की, भारतीय प्रिमियम स्मार्टफोन खंडात वार्षिक आधारावर २०१७ मध्ये २० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या खंडात ३० हजार रूपये आणि त्याहून महागडे स्मार्टफोन येतात. यानुसार गेल्यावर्षी प्रिमियम स्मार्टफोन खंड संख्येनुसार यात २० टक्के वाढ झाली आहे. तेच मूल्याच्या दृष्टीने यात २०१७ मध्ये २८ टक्के वाढ झाली आहे.