WhatsApp वर चुकूनही 'हे' मेसेज पाठवू नका ; अन्यथा तुम्हाला जाव लागू शकतं तुरुगांत!

WhatsApp Crime: WhatsApp हे जगातील सर्वात जास्त वापरले जाणारे मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे, ते खूप महत्वाचे आहे, परंतु जर तुम्ही त्यावर सतत काही चुका करत असाल तर ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.

Updated: Nov 12, 2022, 03:10 PM IST
WhatsApp वर चुकूनही 'हे' मेसेज पाठवू नका ; अन्यथा तुम्हाला जाव लागू शकतं तुरुगांत! title=

whatsapp News :  सध्याच्या युगात प्रत्येक व्यक्ती WhatsApp चा वापर करतो. आपले व्हॉट्सअॅप अनेक ग्रुप्सशी जोडलेले असातात. त्यामुळे ते सावधगिरीने वापरायला हवे.  खरं तर व्हॉट्सअॅप ग्रुप्समध्ये (whatsapp Group) अशा काही गोष्टी आहेत ज्या टाळल्या पाहिजेत. कारण व्हॉट्सअ‍ॅपवरून केलेले काही मेसेज तुम्हाला जेलची हवा खायला लावू शकतात. त्यामुळे अशा स्वरुपाचे व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस (Whatsapp Msg) पाठवताना काळजी घेणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला अशाचं काही मेसेजबद्दल सांगणार आहोत. जे मेसेज पाठवल्यानंतर तुम्हाला तुरुंगात जावू शकतात. म्हणून हे टाळण्यासाठी तुम्हाला अशा मेसेजसंदर्भात माहिती असणं गरजेचं आहे. चला तर मग अशा मेसेजसंदर्भात जाणून घेऊयात...     

हिंसक मेसेज

जर तुम्ही व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये कोणत्याही प्रकारचा हिंसक मजकूर पाठवत असाल तर तुम्हाला तुरुंगात जावं लागेल. खरं तर, जर ग्रुपमध्ये उपस्थित असलेल्या एका सदस्याला यावर काही आक्षेप असेल, तर तो तुमच्याविरुद्ध तक्रार दाखल करू शकतो. त्यानंतर तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते. अशा स्थितीत, तुम्ही असा कोणताही मजकूर ग्रुपमध्ये शेअर करणे टाळावे.

बालगुन्हेगारीशी संबंधित व्हिडिओ

जर तुम्ही बालगुन्हेगारीशी संबंधित कोणत्याही प्रकारचे व्हिडीओ व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठवत असाल तर तुमच्यावर कडक कारवाई केली जाऊ शकते.  हे एक संवेदनशील विषय असल्याने ग्रुपवर ही चूक केल्यास तुरुंगात जावे लागेल. देखील येऊ शकते. अशा स्थितीत चुकूनही करू नये.    

भडकाऊ संदेश पाठवू नका

आपण कोणत्याही चित्रपटाची पायरेसी लिंक किंवा 21 दिवसांत पैसे दुप्पट करण्यासाठी लिंक व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवित असाल तर आपले खाते बंद केले जाऊ शकते. एखाद्या व्यक्तीने आपल्या संदेशाविरूद्ध तक्रार दाखल केल्यास आपल्यावर कारवाई होऊ शकते. व्हॉट्सअ‍ॅपवर धमकावणारे असभ्य संदेश पाठवू नका. हे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. तुम्ही पाठवलेल्या संदेशाची तक्रार एखाद्या व्यक्तीने पोलिस स्टेशनमध्ये केली, तर तुमची चौकशी होऊन योग्य कारवाई केली जाऊ शकते.

वाचा : मोहम्मद शमीने घातलेला गोंधळ पाहून रोहित शर्मा भडकला, हार्दिकही चिडला; पाहा Video  

सॉफ्टवेअर हॅक करण्याचा प्रयत्न करू नका

आपण सॉफ्टवेअर अभियंता असल्यास, चुकूनही सॉफ्टवेअर हॅक करू नका. कारण व्हॉट्सअॅप सॉफ्टवेअर हॅक करण्याचा प्रयत्न करणे, हा एक गंभीर गुन्हा मानला जातो. व्हॉट्सअ‍ॅप सॉफ्टवेअर हॅक केल्याबद्दल कंपनीकडून कायदेशीर नोटीस पाठविली जाऊ शकते. 

बनावट खाते तयार करू नका

व्हॉट्सअ‍ॅपवर बनावट अकाउंट तयार करून लोकांना त्रास देऊ नका. बनावट खात्यांसह लोकांना त्रास देणे, हे गुन्ह्याच्या कक्षेत असल्याचे मानले जाते. जर कोणी आपल्या बनावट खात्याविरुद्ध तक्रार दिली तर आपल्याला तुरूंगात जावे लागू शकते.