मुंबई : व्हॉट्सऍप (WhatsApp) चॅट हिस्ट्री ट्रान्सफरः व्हॉट्सऍप त्याच्या प्लॅटफॉर्मवर नवीन फीचरची चाचणी घेत आहे. ज्याद्वारे यूझर्स ऍन्ड्रॉइड (Android)आणि आयओएस (iOS) फोनमध्ये त्यांची चॅट हिस्ट्री (WhatsApp Chat History) माइग्रेट करू शकतात. व्हॉट्सऍपच्या मते, व्हॉट्सऍप (WhatsApp) चॅट हिस्ट्रीचे स्थलांतर करण्यास मदत करणारे कोणताही थर्ड पार्टी ऍप (Third-Party App) कंपनीच्या नियमांचे उलंघन करतात तसेच ते वापल्यावर लोकांचा डेटा सुद्धा वापरला जाऊ शकतो. म्हणूनच कंपनी आपल्या ऍपसाठी ही सुविधा तयार करत आहे.
WABetaInfoच्या अहवालानुसार नवीन चॅट हिस्ट्री माइग्रेशन फीचरला फ्यूचर अपडेट मध्ये सामाविष्ट केले जाईल. अजून तरी हे फीचर लॉन्च झाल्याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अहवालानुसार हे फीचर यूझर्सना ऍन्ड्रॉइड (Android) वरून आयओएसवर (iOS) चॅट हिस्ट्रीला माइग्रेट करण्यास देखील परवानगी देईल.
अहवालानुसार, व्हॉट्सऍप (WhatsApp) यूझर्सनी डिव्हाइसला वेगळ्या ऑपरेटिंग सिस्टमशी लिंक करण्याचा प्रयत्न केला असता, ऍपला ऍप स्टोअरच्या टेस्टफ्लाइटवर उपलब्ध लेटेस्ट वर्जनमध्ये अपडेट करण्याची आवश्कता आहे.
चॅट हिस्ट्री माइग्रेशन फीचर मल्टी-डिव्हाइस फंक्शन्सचा एक भाग आहे. ज्यावर व्हॉट्सऍप (WhatsApp) काही काळपासून काम करत आहे. अलीकडे, WABetaInfoने व्हॉट्सऍप वेब बीटा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे.
ज्यामध्ये असे सुचविण्यात आले आहे की, यूझर्स लवकरच विना इंटरनेटशी कनेक्ट करता व्हाट्सएप वेब (WhatsApp web) ऍप्लीकेशनचा वापर करु शकतात. हे फीचर प्रथम ऍन्ड्रॉइडवर आणले गेले होते आणि आता आयओएसवरही (iOS) डेवल्पमेंट होत आसल्याची माहिती समोर येत आहे.