WhatsApp Delete for Everyone after 2 Days : WhatsApp युजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. WhatsApp हे जगात चॅटिंग करण्यासाठी सगळ्यात आवडतं अॅप आहे. WhatsApp वर असलेले अनेक फिचर्स हे यूजर्सला आकर्षित करतात. ग्रुप चॉट, वॉइस कॉल्स, व्हिडीओ कॉल्स या सुविधांमुळे लोकांना रोजच्या जीवनात खूप फायदेशीर ठरते. आपण WhatsApp वरील चॉटमधील एखादा मेसेज डिलीट करु शकतो. मात्र मेसेज केल्याचा काही सेकंदात तुम्हाला तो मेसेज डिलीट करावा लागतो.
आम्हाला सांगा तुम्ही एखादा मेसेज चुकीच्या ग्रुपवर कधी केला आहे का? आणि तुम्हाला ही चूक लक्षात यायला वेळ लागला. मग अशावेळी तुम्ही तो मेसेज डिलीट करु शकत नाही. पण आता काळजी करु नका, कारण WhatsApp कायम अपडेट होतं असतं. WhatsApp Delete for Everyone यासंदर्भात नवीन अपडेट केलं आहे. (whatsapp delete for everyone message time limit and new features in marathi)
WhatsApp Delete for Everyone Time Limit वाढविण्यावर कधीपासून काम करत होता. आता WhatsApp यूजर्ससाठी आनंदाची गोष्ट आहे की फायनली हे काम पूर्ण झालं आहे.
या नवीन फीचरमुळे आता तुम्ही 2 दिवसांनंतरही मेसेज Delete for Everyone करु शकता. WhatsApp ने Delete for Everyone Time Limit हे 2 दिवस आणि 12 तासापर्यंत वाढवलं आहे. आता या फीचरमुळे तुम्ही एखादा मेसेज 2 दिवसांनी डिलीट करु शकता.
हे नवीन फीचर अँड्रॉइड आणि iOS यासाठी रिलीझ करण्यात आलं आहे. हे फीचर वापरण्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमधील व्हॉट्सअॅप अपडेट करावा लागणार आहे.