या फोन्सची Whatsapp सेवा लवकरच होणार बंद

व्हॉट्सअ‍ॅप गेल्या काही दिवसांपासून चांगलंच चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपची सेवा बंद झाल्यानेही खळबळ उडाली होती.

Updated: Nov 10, 2017, 10:38 AM IST
या फोन्सची Whatsapp सेवा लवकरच होणार बंद title=

नवी दिल्ली : व्हॉट्सअ‍ॅप गेल्या काही दिवसांपासून चांगलंच चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपची सेवा बंद झाल्यानेही खळबळ उडाली होती.

आता पुन्हा एकदा व्हॉट्सअ‍ॅप बंद होण्याच्या कारणामुळे चर्चेत आलं आहे. यावर्षानंतर व्हॉट्सअ‍ॅप काही फोन्सवर बंद होणार आहे. याआधीही कंपनीने याची माहिती दिली होती. पण तारीख वाढण्यात आली होती. आता अ‍ॅन्ड्रॉईड किंवा विंडोजचं जूनं व्हर्जन आणि काही आणखी प्लॅटफॉर्मवर व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन फिचर्स सपोर्ट करणार नाही. त्यामुळे कंपनीने या फोन्सवरून व्हॉट्सअ‍ॅपवर बंद केलं जाणार आहे. मात्र कधीपासून बंद होईल याबाबत काही अधिकॄत माहिती देण्यात आलेली नाहीये. पण भविष्यात हे होणार हे नक्की आहे.

कोणत्या फोन्सवर चालणार नाही व्हॉट्सअ‍ॅप?

अ‍ॅपल आयफोन -

२००९ मध्ये लॉन्च झालेल्या सेकंद जनरेशनच्या अ‍ॅपल आयफोन 3GS आणि iOS 6 ऑपरेटींग सिस्टम असलेल्या फोनवर व्हॉट्सअ‍ॅप काम करणार नाही. या फोनची ऑपरेटींग सिस्टम व्हॉट्सअ‍ॅपला सपोर्ट करत नाही. 

अ‍ॅन्ड्रॉईड ऑपरेटींग सिस्टम -

अ‍ॅन्ड्रॉईड २.१ आणि २.२ ऑपरेटींग सिस्टम असलेल्या मोबाईलवही व्हॉट्सअ‍ॅप चालणार नाहीये. ३१ डिसेंबरनंतर या फोनवर व्हॉट्सअ‍ॅप बंद होईल. मात्र ही तारीख अधिकृत नाहीये. 

विंडोज -

विंडोज ७ ऑपरेटींग सिस्टम असलेल्या सर्वच स्मार्टफोनवरून व्हॉट्सअ‍ॅप बंद होईल. मायक्रोसॉफ्टने ऑक्टोबर २०१०मध्ये हे लॉन्च केलं होतं आणि २०१४ मध्ये बंद केली होती. 

नोकिया सीरिज -

नोकिया एस४० आणि नोकिया सिम्बियन एस६० मध्ये सुद्धा व्हॉट्सअ‍ॅप बंद होणार आहे. या फोनच्या यूजर्सना ३१ डिसेंबर २०१७ पर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. 

ब्लॅकबेरी -

ब्लॅकबेरीने आपल्या स्मार्टफोनची निर्मिती बंद केली आहे. व्हॉट्सअ‍ॅपने सुद्धा या फोनवर आपली सुविधा बंद करण्याची घोषणा केली आहे. आता ब्लॅकबेरी ओएस आणि ब्लॅकबेरी १० वर व्हॉट्सअ‍ॅपची सुविधा मिळणार नाही. तर काही फोनची ही सुविधा बंद करण्यात आली आहे.