मुंबई : चीनच्या शाओमी कंपनीने भारतीय बाजारात बुधवारी एक नवीन स्मार्टफोन Redmi Y3 लॉन्च केला आहे. कंपनीने Redmi Y3 या स्मार्टफोनला दोन प्रकारची रॅम असलेला फोन लॉन्च केला आहे. पहिला स्मार्टफोन 3 जीबी रॅमसोबत 32 जीबी अंतर्गत स्टोरेजसह आहे, तर आणखी त्यात 4जीबी रॅमसोबत 64 जीबी अंतर्गत स्टोरेजसह असणारा फोन देखील लॉन्च करण्यात आला आहे.
Redmi Y3च्या 3 जीबी आणि 32 जीबी असलेला स्मार्टफोनची किंमत 9 हजार 999 रुपये इतकी आहे. 4 जीबी आणि 64 जीबी असलेला स्मार्टफोनची किंमत 11 हजार 999 रुपये आहे. या मोबाईलची विशेषता आहे की, या मोबाईलमध्ये 32 मेगापिक्सलचा सुपर सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
शाओमीचा हा स्मार्टफोन Mi.com, फ्लिपकार्ट आणि Mi Home Store वर 30 एप्रिलला ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. नवीन मोबाईलवर ग्राहकांना 1120 जीबी 4G डाटा एअरटेल कंपनीकडून मिळणार आहे.
32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरामध्ये ऑटो एचडीआर देण्यात आले आहे. Redmi Y3 मोबाईलमध्ये A1 डबल कॅमेरा सेटअप आहे. मोबाईलच्या मागे 12 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा देण्यात आलेला आहे. ज्यामध्ये Google लेंस पर्याय दिलेले आहे.
मोबाईलमध्ये 6.26 इंच एचडी प्लस आयपीएस डिस्प्ले आहे. हा फोन कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 संरक्षणासह सादर केला गेला आहे. बाजारामध्ये बोल्ड रेड, एलिगँट ब्लू आणि प्राइम ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध असेल.
या फोनमध्ये 4,000 mAh बॅटरी आहे, कंपनीचे म्हणणे आहे की, मोबाईल एकदा चार्ज केल्यानंतर याची बॅटरी 2 दिवस राहिल असा कंपनीचा दावा आहे. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 632 प्रोसेसर आहे.
हा मोबाईल Android 9 pie वर MIUI 10 वर चालणार आहे. Redmi Y3 स्मार्टफोनमध्ये मेमेरी कार्डच्या स्लॉटसोबत ट्रिपल कार्ड स्लॉट आहे. मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने मोबाईलीची अंतर्गत स्टोरेज 512 जीबी इतकी वाढवता येईल.