मुंबई : फेसबुकचा डाटा सुरक्षित नसल्याने जगभरातील कोट्यावधीहून अधिक युजर्सची वैयक्तिक माहिती सुरक्षित नसल्याची समोर आली आहे. या धक्कादायक खुलास्यानंतर आता डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक मार्ग सुचवले जात आहेत. मात्र अनेक गोष्टी या फसव्या आहेत.
BFF टाईप करा, त्यानंतर शब्द हिरवा झाला तर तुमचा डाटा सुरक्षित आहे. शब्द हिरावा न झाल्यास तुमचा पासवर्ड तात्काळ बदला अशा आशायाचे काही मेसेज सध्या सोशलमीडियावर, फेसबूकवर व्हायरल होत आहे. मात्र ही केवळ अफवा आहे.
पाच कोटी फेसबुक यूझर्सच्या खासगी माहितीचा गैरवापर झाल्याप्रकरणी फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गनं माफीनामा सादर केलाय. फेसबुकच्या यूझर्सनी शेअर केलेली माहिती जपण्याची जबाबदारी कंपनीची आहे. जर, अशी माहिती लीक झाली असेल, तर ती कंपनीची चूक आहे. असं झुकरबर्गनं त्याच्या फेसबुक पेजवर म्हटलंय.भविष्यात अशाप्रकारची डेटा चोरी होऊ नये याची खबरदारी घेतली जाईल असंही झुकरबर्गनं स्पष्ट केलंय.
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीच्या काळात फेसबूकच्या पाच कोटी यूझर्सची खासगी माहिती केम्ब्रिज अॅनालिटीका नावाच्या एका कंपनीनं वापरली. त्याआधारे नागरिक मतदानात कोणत्या पक्षाला करतील याचा अंदाज बांधल्याचं अमेरिकन तपास यंत्रणांच्या चौकशीत पुढे आलंय. प्रकरण उघड झाल्यापासून फेसबुककडून कुणीही प्रतिक्रिया दिली नव्हती. बुधवारी झुकरबर्ग आणि त्याच्या कंपनीच्या सीईओ सीरील सँडबर्ग यांनी फेसबूक पोस्टद्वारे आपली दिलगिरी व्यक्त केली.
डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी फेसबुकवर कोणत्याही प्रकारची अॅप वापरणं टाळा.
अॅपची नोटिफिकेशन्स बंद करण्यासाठी सेटिंगमध्ये त्याप्रकारचे ऑप्शन्स बंद करा.