मुंबई : झेन कंपनीनं अॅडमायर युनिटी नावाचा नवा बजेट स्मार्टफोन लॉन्च केला आहे. ५,०९९ रुपये किंमत असलेल्या या स्मार्टफोनमध्ये प्रादेशिक भाषाही उपलब्ध आहेत. झेनच्या या स्मार्टफोनमध्ये 4G Volte असून 1.3GHz क्वाडकोर प्रोसेसर आणि 5 इंचांची स्क्रिन आहे.
या स्मार्टफोनची बॅटरी 2300 mAh एवढी आहे तर स्मार्टफोनला 5 मेगापिक्सलचा फ्लॅश असलेला रियर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
अॅडमायर युनिटी स्मार्टफोनमध्ये 1GB RAM आणि 8 GB इंटरनल मेमरी असून 32GB पर्यंत मेमरी वाढवता येणार आहे. या स्मार्टफोनमध्ये अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ, व्हिस्टोसो, गो2पे, चिलएक्स आणि झेन स्टोअर ही ऍप्स इनबिल्ड आहेत. तर बबल बॅश 3, मॉर्डन कॉम्बॅट 4, मोटोक्रॉस: ट्रायल एक्सट्रीम हे गेमही मोबाईलमध्ये आहेत.