Gautami Patil Dance : लावणी डान्सर गौतमी पाटील (Gautami Patil) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गौैतमी पाटील विरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. गौतमी विरोधता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची ही पहिलीच घटना आहे. सोलापुर येथे गौतमीचा कार्यक्रम होता. हा कार्यक्रम आयोजीत करणाऱ्याने आयोजकानेच गौतमी पाटील विरोधात तक्रार दाखल केली आहे. आयोजकाने तक्रारीत गौतमी आणि तिच्या सहकाऱ्यावर गंभीर आरोप केले आहे.
गौतमी पाटीलविरोधात बार्शी येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गौतमी पाटील आणि तिचा सहकारी केतन मारणे यांच्याविरोधात तक्रार अर्ज देण्यात आला आहे. बार्शीतील कार्यक्रमाचे आयोजक राजेंद्र गायकवाड यांनीच गौतमी विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
आपली फसवणूक करुन मानसिक त्रास दिल्याचा आरोप करत आयोजक राजेंद्र गायकवाड यांनी पोलिसात धाव घेतली आहे. 12 मे रोजी बार्शीत गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, गौतमी संध्याकाळी 7 ऐवजी 10 वाजता स्टेजवर आल्यानं पोलिसांनी कार्यक्रम बंद पाडला.
या कार्यक्रमासाठी ठरलेल्या मानधनापेक्षा जास्त पैसे गौतमीनं घेतले असा आरोप गायकवाडांनी केला आहे. तसंच नियोजित कार्यक्रमाला उशिरा येऊन माझी बदनामी करण्याच्या हेतूने फसवणूक केल्याचेही गायकवाड यांनी तक्रारीत म्हटल आहे.
12 मे 2023 रोजी बार्शी येथे गौतमीचा कार्यक्रम होता. राजेंद्र गायकवाड यांनी हा कार्यक्रम आयोजीत केला होता.
गौतमी उशीरा आल्यामुळे 7 वाजताचा कार्यक्रम दहा वाजता सुरु झाला. वेळेची मर्यादा ओलांडली गेल्यामुळे पोलिसांनी गौतमीचा कार्यक्रम बंद पाडला. गौतमीची अदाकारी पाहण्यासाठी आलेल्या बार्शीकरांना तिच्या एकाच गाण्यावर समाधान मानावं लागलं. गौतमीच्या नृत्याचा आस्वाद घेता आल्यानं बार्शीकर नाराज झाले. कार्यक्रमात वेळेची मर्यादा ओलांडली गेल्यामुळे पोलिसांनी आयोजांवर लगुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली होती. आता मात्र, आयोजक राजेंद्र गायकवाड यांनी थेट तमी विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने यात वेगलाच ट्विस्ट आला आहे.
गौतमीच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी होते. गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी एकच झुंबड उडते. कधी कुठे कुण झाडावर चढतं. तर, कुणी घराच्या छतावर चढून गौतमीचा डान्स पाहण्याचा प्रयत्न करतात. सांगलीच्या तासगाव आगारातील एका एसटी चालकाने तर शो पाहण्यासाठी चक्क सुट्टीसाठी अर्ज केला.