कोल्हापूर: राज्याच्या शेजारील राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण सापडल्यानंतर राज्यातील देवस्थानं अधिक सतर्क झाली आहेत. कोल्हापुरात करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील निर्बंध पुन्हा कडक केले जाणार आहेत.
गर्दी टाळण्यासाठी ई पासची संख्या कमी केली जाणार आहे. त्यानुसार तासाला 1200 भाविकांनाच देवीचे दर्शन घेता येणार आहे. गरज वाटल्यास ही संख्या 700 पर्यंत खाली आणली जाऊ शकते. तर दुसरी कडे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती कडून विशेष काळजी घेतली जात आहे.
अंबाबाई मंदिरात तासाला 600 भाविक दर्शन घेत आहेत.दर्शन रांगेत मास्क असल्याशिवाय भाविकांना प्रवेश दिला जात नाही. दर्शन रांगेत 3 ते 4 ठिकाणी सॅनिटायझर वापर होतो. दर्शन रांगेत सोशल डिस्टंसिंग पालन करण्याची सूचना दिली जाते. दर 2 तासाला मंदिर आणि दर्शन रांग स्वच्छ्ता केली जात आहे.
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये पुन्हा कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तासाला 1200 भाविकांनाच दर्शन घेता येणार आहे. तर पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठीही कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये हा पहिला रुग्ण सापडला आहे. त्यामुऴे प्रशासन यंत्रणा अलर्टवर आहे.