निद्रानाश हे पदार्थ खाल्ल्याने दूर करता येऊ शकतो

हा त्रास थांबवण्य़ासाठी तुमच्या आहारात देखील योग्य ते बदल करणे आवश्यक आहे, काही पदार्थ तुमचा निद्रानाश दूर करण्यात मदत करतात.

Updated: Dec 1, 2017, 09:30 PM IST
निद्रानाश हे पदार्थ खाल्ल्याने दूर करता येऊ शकतो title=

मुंबई : अनेक वेळा ताणतणाव, झोपेची वेळ सतत चुकणे, थकवा येणे, यामुळे निद्रानाशाचा त्रास होतो, हा त्रास थांबवण्य़ासाठी तुमच्या आहारात देखील योग्य ते बदल करणे आवश्यक आहे, काही पदार्थ तुमचा निद्रानाश दूर करण्यात मदत करतात.

बदाम

रोज बदाम खाल्ल्यानं मॅग्नेशियमची पातळी योग्य प्रमाणात राखली जाते.बदामामध्ये मॅग्नेशियम असतं, जे शांत झोप लागण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं.  की मॅग्नेशियमचं शरीरातील प्रमाण कमी झाल्यास झोप लागत नाही.

अक्रोड

टेक्सास विद्यापीठाने केलेल्या संशोधनानुसार अक्रोडमध्ये असलेल्या मेलाटोनिनमुळे चांगली झोप लागण्यास मदत होते. अक्रोडामध्ये अमिनो अॅसिड ट्रायप्टोफान हा झोप सुधारण्यासाठी मदत करणारा घटक मोठ्याप्रमाणावर असतो. या घटकामुळे शरीराचे वेळापत्रक, झोप लागण्याचे व उठण्याचे वेळापत्रक व्यवस्थित राखणाऱ्या मेलाटोनिन व सेरोटोनिनची पातळी योग्य राहाते. 

मध

मध झोप येण्यास मदत करतं कारण, मधात असलेल्या ग्लुकोजमुळे मेंदूला निद्रानाश, उत्तेजना, तसेच भूक यासारखे, संदेश देणारे ओरेक्सिन बंद करण्याचा संदेश मिळतो, असं म्हणतात.

भात

वैद्यकीय पोषणतत्वांबाबत अमेरिकन जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, जास्मिन तांदळापासून बनवलेला भात खाणाऱ्या लोकांना इतरांच्या तुलनेत लवकर झोप लागते. आणि त्याचा वापर करुन झोपेच्या समस्येपासून तुमची सुटका करुन घ्या.

आतापर्यंत आपण आरोग्यासाठी भात कसा चांगला नाही हे ऐकलं असेल, पण त्यामुळे चांगली झोप लागण्यास मदत होते हे तुम्हाला माहीत आहे का? याचा ग्लायसेमिक इंडेक्स उच्च असल्यामुळे झोप लागण्यासाठी जाणारा वेळ कमी होतो.