Earth is in danger : सारं जग एका ठराविक वेगानं पुढे जात असून, नवनवीन संशोधनं आणि नव्या आविष्कारांच्या बळावर या जगाती नेमकी प्रगती कशी सुरुय याचा अंदाज अनेकांना येत आहे. पण, प्रगतीच्या वाटेवर जाणाऱ्या या जगाचा, या सृष्टीचा अंतही तितक्याच वेगानं जवळ येतोय याची कल्पना आहे का? जाणून धडकी भरेल, पण मागील वर्षी पृथ्वीच्या उदरात सलग 9 दिवस कंपनं जाणवली आणि आता त्यामागचं मुख्य कारणंही समोर आलं आहे.
वैज्ञानिक आणि अभ्यासकांच्या माहितीनुसार ही घटना एका पर्वताचं शिखर कोसळल्यामुळं घडली असून, फजॉर्डच्या अंतर्गत भागात सक्रिय असणाऱ्या एका महाकाय त्सुनामीमुळं उत्पन्न झाली. 2023 च्या डिसेंबर महिन्यात 650 फूट म्हणजेच 200 मीटर उंच लाटा ग्रीनलँडच्या डिक्सन फजॉर्डच्या अंतर्गत भागात मागे-पुढे घुटमळत होत्या. ज्यामुळं इथं सलग 9 दिवस भूकंपाचे हादरे जाणवले.
इथं, पर्वतशिखर कोसळल्यामुळं इतकी उर्जा उत्पन्न झाली, की दीर्घ कालावधीसाठी धरणीकंप जाणवले. सातत्यानं होणाऱ्या हवामान बदलांमुळं अशा प्रकारच्या घटना घडत असून, सुरुवातीला इथं भूकंपाचे संकेत नेमके कुठून मिळत आहेत याबाबतची कोणतीही माहिती मिळाली नव्हती.
प्रत्यक्षात ग्रीनलँडमध्ये डिक्सन जॉर्ड इशं असणारे ग्लेशियर तळापासून वितळत होते. त्यासमोरील भागात असणाऱ्या पाण्याचेही दोन भाग होते. एक भाग म्हणजे थंड आणि स्वच्छ पाण्याचा आणि दुसरा भाग खाऱ्या पाण्याचा. त्यातच ग्लेशियरवरील बर्फाचे तुकडे या पाण्यात पडून त्यामुळं मोठ्या लाटा निर्माण होत होत्या. इथं निर्माण होणाऱ्या याच महाकाय लाटांचे परिणाम पृथ्वीच्या पृष्ठभागावरील थरावर दिसून आले आणि या लाटांचे परिणाम वैज्ञानिकांनाही हैराण करून गेले.
ग्रीनलँडमध्ये असणाऱ्या उंच पर्वतांवरील पर्वतकड्यांना जॉर्ड असं म्हणतात. हा भाग समुद्राच्या पृष्ठाशी जोडलेला असतो. या जॉर्डवरही मोठाले ग्लेशियर असतात, हेच ग्लेशियर भंग पावल्यास महाकाय लाटा अर्थात त्सुनामीची निर्मिती होते.