Miss Universe : अमेरिकेच्या लुईझियाना राज्यातील न्यू ऑर्लिन्स शहरात आयोजित 71 व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत (Miss Universe 2022) मिस युनिव्हर्स 2022 च्या नावाची घोषणा करण्यात आली. अमेरिकेच्या आर बॉने गॅब्रिएल (R'bonney Gabriel) हिने मिस युनिव्हर्स 2022 चा किताब जिंकला असून भारताची दिविता राय टॉप 5 मध्ये पोहोचू शकली नाही. 71 व्या मिस युनिव्हर्सचा ताज अमेरिकेला मिळाला आहे. मिस युनिव्हर्ससाठी टॉप 3 स्पर्धकांची निवड करण्यात आली. व्हेनेझुएला, यूएस आणि डोमिनिकन रिपब्लिकमधील स्पर्धकांना या टॉप 3 स्पर्धकांच्या यादीत स्थान मिळाले.
यावेळी मिस युनिव्हर्सचा किताब अमेरिकेच्या आर बॉने ग्रेब्रिएल हिने (R'bonney Gabriel) पटकावला आहे. या स्पर्धेतील 84 सुंदरींना मागे टाकत तिने हे विजेतेपद पटकावण्यात यश मिळवले आहे. त्याचवेळी व्हेनेझुएलाची डायना सिल्वा दुसऱ्या तर डॉमिनिकन रिपब्लिकची अॅमी पेना तिसऱ्या स्थानावर राहिली. या स्पर्धेत भारताची निराशा झाली आहे. मिस दिवा युनिव्हर्स 2022 असलेली भारतीय स्पर्धक दिविता राय टॉप 5 मध्ये पोहोचू शकली नाही.
The new Miss Universe is USA!!! #MISSUNIVERSE pic.twitter.com/7vryvLV92Y
— Miss Universe (@MissUniverse) January 15, 2023
या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना दिविता राय हिने (Divita Rai) आपल्या वेशभूषेने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले, ज्यामध्ये ती सोनेरी ड्रेस परिधान करुन आली होती. प्रोफेशनल मॉडेल दिविता राय ही कर्नाटकची रहिवासी असून तिने आर्किटेक्टमध्ये शिक्षण घेतले आहे.
1994 मध्ये सुरु झालेल्या मिस युनिव्हर्सचा किताब भारताने तीन वेळा जिंकला आहे. यावर्षी बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने हा किताब जिंकला आणि भारताची पहिली मिस युनिव्हर्स बनली. त्यांच्यानंतर लारा दत्ताने 2000 मध्ये मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला. 2021 मध्ये हरनाज संधू हिने भारताच्या खात्यात मिस युनिव्हर्सचा तिसरा किताब पटकावला.
The official Miss Universe is… USA pic.twitter.com/mBZvNTJN1m
— Miss Universe (@MissUniverse) January 15, 2023
मिस युनिव्हर्स 2022 च्या मुकुटाची किंमत 6 दशलक्ष अमेरिकन डॉलर म्हणजेच सुमारे 49 कोटी रुपये आहे. यावेळचा मुकुट खूपच खास असल्याचे बोलले जात आहे. 'फोर्स फॉर गुड' नावाचा हा मुकुट मौवाड नावाच्या कंपनीने तयार केला आहे. हा मुकुट दर्शवितो की महिलांनी तयार केलेले भविष्य शक्यतांच्या मर्यादेपलीकडे आहे.