Canadian PM Justin Trudeau Video : खलिस्तानी अतिरेकी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येवर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (Justin Trudeau) यांनी भारतावर आरोप केले होते. निज्जरच्या हत्येमागे भारतीय गुप्तहेर संघटनेचा (R&AW) हात असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर दोन्ही देशातील वाद टोकाला पोहोचला अन् भारत आणि कॅनडा (IND vs CAN) यांच्यातील संबंध ताणले गेले. कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीयांना यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे कॅनडियन नागरिकांची देखील गोची झाल्याचं दिसून आलं. अशातच आता कॅनडियन नागरिकांनी (Angry Canadian) थेट पंतप्रधानांसमोर राग व्यक्त केला आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत असल्याचं दिसतंय.
कॅनडियन पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये ट्रुडो आपल्या समर्थकांशी संवाद साधत आहेत. त्यावेळी त्यांनी लोकांची भेट घेतली अन् लहान मुलांची विचारपूस केली. त्यावेळी एक व्यक्ती त्याठिकाणी आला अन् त्याने थेट पंतप्रधानांशी पंगा घेतला. मी तुमच्याशी हात मिळवणार नाही. कारण तुम्ही नालायक आहात. तुम्ही संपूर्ण देशाची वाट लावली आहे, असं कॅनडियन नागरिक म्हणाला आहे.
व्यक्तीच्या आरोपानंतर पंतप्रधानांना धक्का बसला अन् मी देशाची वाट लावली आहे का? असा सवाल त्यांनी त्या नागरिकाला विचारला. या देशात कोणाला घर घेणं परवडतंय का?, असा सवाल त्याने विचारला. तुम्ही नागरिकांवर कार्बन टॅक्स लादत आहात. लोकांच्या टॅक्समधून जमा झालेले 10 अब्ज डॉलर तुम्ही युक्रेनला का दिले? असा सवाल विचारताच पंतप्रधानांनी तिथून पळ काढणं बरोबर समजलं. भारताला डिवचल्यानंतर कॅनडियन पंतप्रधानांना सर्वत्र उत्तरं द्यावी लागत आहेत, त्यामुळे त्यांच्या अडचणी देखील वाढल्याचं पहायला मिळतंय.
Trudeau gets confronted by a Toronto mans: "I'm not shaking your hand... you f*cked up this entire country".
What do you think? pic.twitter.com/rvQux8VScn
— Efrain Flores Monsanto (@realmonsanto) October 5, 2023
दरम्यान, भारत आपल्या भूमिकेवर तटून राहिल्याने पीएम जस्टिन टूड्रो यांनी नमती भूमिका घेतली. कॅनडाचा भारताला चिथावणी देण्याचा कोणताही प्रयत्न नाही. भारताने हे प्रकरण गांभीर्याने घ्यावं आणि सत्य समोर आणण्यासाठी कॅनडासोबत काम करावं, या प्रकरणात संपूर्ण पारदर्शकता, जबाबदारी आणि न्याय सुनिश्चित करण्यासाठी आमच्यासोबत काम करण्यास सांगतोय, असं कॅनडाच्या पंतप्रधानांनी म्हटलं होतं.