Bachelor Party Viral Video : लग्नापूर्वी नवरदेव खास करुन लग्नाच्या दिवसाशिवाय ज्या दिवसाची अधिक वाट पाहतो ते म्हणजे बॅचरल पार्टी. असं म्हणतात की, बोहल्यावर चढल्यानंतर सिंगल आयुष्य संपतं. मग अशावेळी जवळच्या मिंत्रासह त्या पार्टी नवरदेव त्याचा सगळ्या इच्छा पूर्ण करतो. जे आता त्याला लग्नानंतर करता येणार नाही. मनसोक्त दारु, आजूबाजूला नाचणाऱ्या मुली आणि बरचं काही...हल्ली या पार्टीचा ट्रेंड वाढला आहे. प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने बॅचरल पार्टी साजरी करत असतो. (bachelor party on wedding Lady singer hug the groom watch how bride reacts video viral social trending now)
लग्नाच्या काही दिवसा आधी ही पार्टी होते. कधी कधी लग्नाच्या आदल्या रात्री नवरदेव आपल्या मित्रांसोबत ही रात्र साजरा करतो. पण तुम्ही कधी लग्नाच्या दिवशी आणि तेही वधूसमोर बॅचलर पार्टी पाहिली आहे का? या पार्टीबद्दल वधूला सांगितलं जातं नाही, असं म्हणतात वधूला न आवडणाऱ्या अनेक गोष्टी करत असतो.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता नवरदेव आणि नवरी स्टेजवर एका खुर्चीवर बसलेले आहेत. स्टेजवर एक तरुणी हातात माइक घेऊन गाणं म्हणताना दिसतं आहे. अचानक ही मुलगी गाण म्हणता म्हणता कसरती करायला लागते. एवढंच नाही तर ती तरुणी नवरदेवाच्या जवळ येऊन त्या प्रेम करते आणि त्याला उभं करते. त्यानंतर ती जे करते ते पाहून तर वधूसह वऱ्हाड्यांनाही जबरदस्त धक्का बसतो.
अचानक ती उडी मारते आणि नवरदेवाच्या कुशीत जाऊन बसते. हा परफॉर्मन्स पाहून वधूला हसू आवरत नाही. तर नवरदेवही लाजू लागतो. नवरी हे तरुणीचं हे कृत्य पाहून तिचा चेहरा फुलांच्या गुच्छाने लपवते. जेव्हा तो नवरदेव वधूच्या बाजूला बसतो तेव्हा ती या गुच्छाने त्याला मारते.
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील इन्स्टाग्रामवर chutiyapa_begins_from_here या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. यानंतर या व्हिडीओ लाखो व्ह्यूज आणि हजारो कमेंट्स येतं आहेत.