मुंबई : आपल्याला वाटतं की, श्रीमंत झालो की सगळ्या गोष्टी कशा सहज सोप्या असतात. पण तसं काही नसतं. याचं उत्तम उदाहरण असणारा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. माणसं श्रीमंत होतात आपल्याला त्यांची श्रीमंती दिसते पण त्या श्रीमंती मागे असणारी माणसाची उच्च विचारसरणी दिसत नाही. हे सगळं मांडण्यामागचं कारण म्हणजे जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या बिल गेट्स यांचा हा फोटो. सिलिकॉन वॅलीमधील श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स एका बर्गरसाठी चक्क रांगेत विनम्रपणे उभे असल्याचं समोर आलं आहे. बिल गेट्स हे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक आहे. तसेच अनेक समाजोपयोगी काम देखील ते करतात. असं असताना अगदी सामान्यांप्रमाणे जीवन जगताना बिल गेट्स दिसत आहेत.
बर्गर घेण्यासाठी बिल गेट्स चक्क सामान्यांप्रमाणे रांगेत उभे राहून व्यवहार करतात. आतापर्यंत या पोस्टला 19 हजार लोकांनी लाइक केला असून 15000 लोकांनी शेअर केलं आहे. या फोटोतून आपल्याला हीच गोष्ट शिकायला मिळते की, कितीही श्रीमंत झालो किंवा कितीही मोठ्या पदावर गेलो तरीही काही गोष्टी नियमाने पाळायच्या असतात. त्यातून समाजहित असतं.