महिला पोलीस अधिकाऱ्याचे कैद्यांबरोबर शरीरसंबंध; लपून काढलेला Video समोर आला अन्...

British Women Police Officer Inmate Video: महिला पोलीस अधिकारी तुरुंगात कैद्याबरोबर लैंगिक संबंध ठेवत असल्याचा साडेचार मिनिटांची व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काय घडलं पाहा.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 9, 2025, 03:06 PM IST
महिला पोलीस अधिकाऱ्याचे कैद्यांबरोबर शरीरसंबंध; लपून काढलेला Video समोर आला अन्... title=
महिला पोलीस अधिकाऱ्याला सुनावण्यात आली कठोर शिक्षा (फोटो सोशल मीडियावरुन साभार)

British Women Police Officer Inmate Video: लंडनमधील एका महिला पोलीस अधिकाऱ्याला कैद्याबरोबर तुरुंगातच शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे. या प्रकरणी या महिला पोलीस अधिकाऱ्याला 15 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तुरुंगामध्ये कैद्याबरोबर लैंगिक संबंध ठेवतानाचा या महिला अधिकाऱ्याचा व्हिडीओ शूट करुन व्हायरल करण्यात आल्यानंतर या प्रकरणाचा भांडाफोड झाला. हे प्रकरण कोर्टात जाण्यापूर्वीच या महिला अधिकाऱ्याला पोलीस खात्याने निलंबित केलं आहे.

कोण आहे ही महिला अधिकारी?

समोर आलेल्या माहितीनुसार, सदर प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आलेल्या महिला अधिकाऱ्याचं नाव लिंडा डिसोझा अब्रू (Linda De Sousa Abreu) असं आहे. लिंडा ही 30 वर्षांची असून तिने कोर्टातील सुनावणीदरम्यान आपण तुरुंगामध्ये खरोखरच कैद्याबरोबर शारीरिक संबंध ठेवले होते अशी कबुली दिली आहे. लिंडा ही लंडनमधील एमपीएम वॅण्ड्सवर्थ येथील पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होती तेव्हा हा प्रकार घडला. लेस्लीवर्थ क्राऊन कोर्टाने लिंडाला 6 जानेवारी रोजी शिक्षा सुनावली आहे.

...अन् ती पकडली गेली

न्यायमूर्ती मार्टिन एमंड्स केसी यांच्या समोरच्या सुनावणीदरम्यान, लिंडाने अनेकदा कैद्यांबरोबर लैंगिक संबंध ठेवल्याचं समोर आलं. अशाच एका आरोपीबरोबर लैंगिक संबंध ठेवताना अन्य एका कैद्याने त्याच्याकडे बेकायदेशीररित्या असलेल्या मोबाईलमध्ये सारा प्रकार शूट केला. हा व्हिडीओ एकूण साडेचार मिनिटांचा आहे. या व्हिडीओमध्ये शुटींग करणारा कैदी हा सारा प्रकार तुरुंगात सुरु आहे, असं म्हणताना ऐकू येत आहे. 

तिच्याच ड्रेसवरील कॅमेरातही कैद झाला हा प्रकार

आश्चर्याची बाब म्हणजे लिंडाला तुरुंग प्रशासनाने पुरवलेल्या पोलिसांच्या ड्रेसवरील कॅमेरामध्येही या घटनेचा काही भाग कैद झाला असून हा व्हिडीओ अतिरिक्त पुरावा म्हणून सादर करण्यात आला. त्यावरुनच न्यायालयाने लिंडाचा संयम एकदाच सुटला असं नाही तर तिने अनेकदा असे कृत्य केल्याचं सिद्ध होत आहे, असं म्हटलं. 

विमानतळावर झाली अटक

कैद्याने चोरुन रेकॉर्ड केलेला त्याच्या मोबाईलमधील व्हिडीओ काही लोकांना पाठवला आणि तो पाहता पाहता व्हायरल झाला. सोशल मीडियावरही हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तुरुंग प्रशासनाला जाग आली आणि त्यांनी तपासाला सुरुवात केली. या प्रकरणामध्ये पोलिसांनी हिथरो विमानतळावर लिंडाला अटक केली. लिंडा परदेशात पळून जाण्याच्या तयारीत होती. आपल्या वडिलांबरोबर ती स्पेनमधील माद्रीदला पळून जाण्याआधीच तिला पोलिसांनी तब्यात घेतलं. 

लिंडाच्या वकिलांनी काय म्हटलं?

लिंडाच्या वकिलांनी तिची बाजू मांडताना तिने केलेल्या कृतीची संपूर्ण जबाबदारी तिची असून ती दिली जाईल ती शिक्षा भोगण्यास तयार आहे. हा सारा प्रकार जूनमध्ये घडलेल्या या प्रकरणाची आता चौकशी करुन जवळपास सहा महिन्यांच्या सुनावणीनंतर शिक्षा सुनावण्यात आली आहे. तिला सव्वा वर्षाचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.