6 महिन्यापूर्वीच वाल्मिक कराडला ED ची नोटीस येऊनही राज्य सरकारनं... सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला थेट सवाल

6 महिन्यापूर्वी वाल्मिक कराडविरोधात तक्रार, ईडीने कारवाई का नाही? सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला थेट सवाल.

सोनेश्वर पाटील | Updated: Jan 9, 2025, 06:47 PM IST
6 महिन्यापूर्वीच वाल्मिक कराडला ED ची नोटीस येऊनही राज्य सरकारनं... सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला थेट सवाल title=

Supriya Sule On Walmik Karad : बीड आणि परभणीतील दोन्ही कुटुंबाना जो पर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत सगळं राजकारण बाजूला ठेवून आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत. सुरेश धस, अंजली दमानिया यांनी बीड प्रकरण लावून धरलं आहे. हा मुद्दा बजरंग सोनवणे यांनी संसदेत मांडला. वाल्मिक कराड हे खंडणीच्या प्रकरणात अटकेत असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. 

ईडीने वाल्मिक कराडवर कारवाई का केली नाही? 

संतोष देशमुख यांची हत्या होण्यापूर्वी दोन दिवसांआधी वाल्मिक कराड यांच्यावर एका कंपनीने 11 डिसेंबर 2024 रोजी एफआयआर दाखल केली होता. तरी देखील पोलिसांनी कोणतीही कारवाई का केली नाही असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. याआधी देखील त्यांच्यावर ईडीची केस आहे. नोटीस देखील त्यांना देण्यात आली आहे. अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक यांना ईडीने अटक केली. अवधा कंपनीने 28 मे 2024 रोजी तक्रार करून देखील ईडीने वाल्मिक कराडवर कारवाई का केली नाही? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे. 

वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष कसा? 

लोकसभेनंतर महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली. अशातच वाल्मिक कराड याच्यावर तक्रार असूनही त्याला परळी तालुक्यात त्याला लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष करण्यात आलं. आजही ते लाडकी बहीण योजनेचे परळी तालुक्याचे अध्यक्ष आहे. त्याच्यामुळे अनिल देशमुख, संजय राऊत आणि नवाब मलिक यांना या देशामध्ये एक कायदा आणि वाल्मिक कराड यांना दुसरा कायदा असं का? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी सरकारला विचारला आहे. 

वाल्मिक कराड यांच्याबाबत अर्थ मंत्रालयाला पत्र देणार

पीएमएलए आणि ईडीची कारवाई वाल्मिक कराड यांच्यावर आतापर्यंत का झाली नाही. वाल्मिक कराड यांच्या नावाने 2022 मध्ये नोटीस आली होती. त्यानंतर देखील ईडीने त्यांच्यावर कारवाई का केली नाही. मात्र, संजय राऊत, अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यावर काहीही पुरावे नसताना देखील ईडीने कारवाई केली.  परंतु, अवधा कंपनीकडून एफआयआर दाखल असताना देखील वाल्मिक कराडवर कारवाई का नाही. यासंदर्भात आम्ही अर्थ मंत्रालयाला पत्र देणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. तर वाल्मिक कराडचा विषय राजकीय नाही. तो सामाजिक विषय आहे. अवधा कंपनीने हा गुन्हा दाखल केला आहे. गुंतवणूकदारांनी वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर देखील ईडीने कारवाई केली नाही? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी सरकारला विचारला आहे.