चित्रपट दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खान 60 वर्षांची झाली आहे. या इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा असलेली फराह खान आज जरी कोट्यवधींची मालकीण असली, तरी वडिलांच्या निधनानंतर तिला आर्थिक आणि मानसिक अडचणींचा सामना करावा लागला आणि त्या कठीण काळात तिला स्टोररूममध्ये राहावं लागलं. फराह खानचा जन्म 9 जानेवारी 1965 रोजी मुंबईत झाला. तिचे वडील कामरान खान हे एक प्रसिद्ध स्टंटमॅन आणि चित्रपट निर्माता होते, आणि तिच्या आई मनेका इराणी ही हनी आणि डेझी इराणी यांच्या बहिण होत्या. तिच्या बालपणीच्या संघर्षांनी तिला आजच्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी खूप काही शिकवलं.
फराहने 80 च्या दशकात आपल्या करिअरची सुरुवात केली होती. 1988 मध्ये 'जो जीता वही सिकंदर' चित्रपटातील 'पहेला नशा' गाण्याचे कोरिओग्राफी करून तिने चित्रपट इंडस्ट्रीत प्रवेश केला. त्यानंतर 1990 च्या दशकात ती एक प्रतिष्ठित कोरिओग्राफर म्हणून ओळखली जाऊ लागली. तिच्या कामामुळेच आज ती बॉलिवूडमधील एक प्रमुख दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर म्हणून मान्यता प्राप्त आहे.
फराह खानने 2004 मध्ये 'मैं हूं ना' चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले. या चित्रपटाने तिला खूपच प्रसिद्धी दिली, आणि तिच्या दिग्दर्शनाच्या कौशल्यामुळे ती प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमठवू शकली. नंतरच्या काही वर्षांत 'ओम शांती ओम', 'तीस मार खान' आणि 'हॅपी न्यू ईयर' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शनही तिने केला. 'ओम शांती ओम'साठी तिला विशेष प्रशंसा मिळाली आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवलं.
फराह खानला आपल्या कार्यासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. तिचं यश फक्त चित्रपटांपुरतं मर्यादित नाही; ती अनेक लोकप्रिय टीव्ही शोची जज देखील आहे. 'इंडियन आयडॉल', 'नच बलिये' आणि 'द खतरा शो' सारख्या शोमध्ये ती जज म्हणून दिसली होती. याशिवाय, तिचं यूट्यूब चॅनेल देखील आहे, जिथे ती कुकींग व्हिडीओ आणि इतर कलाकारांच्या घरी जाऊन त्यांच्याशी गप्पा मारताना देखील दिसते.
हे ही वाचा: मुलाच्या क्लोदिंग ब्रँडसाठी शाहरुख खानचा नवीन लूक, चाहते म्हणाले, 'हा तर...'
फराह खानचं वैयक्तिक जीवनही विशेष आहे. 2004 मध्ये तिने चित्रपट निर्माता आणि संपादक शिरीष कुंदर यांच्याशी लग्न केलं. दोघांची भेट 'मैं हूं ना' चित्रपटाच्या सेटवर झाली होती आणि त्यांनी सात महिने डेट केल्यानंतर गोव्यात लग्न केलं. त्यांनी तिन्ही विवाह पद्धतींनी लग्न केले - नोंदणीकृत विवाह, दक्षिण भारतीय रितीरिवाजानुसार आणि निकाह. फराह आणि शिरीष यांना तीन मुलं आहेत: मुलगा झार आणि दोन मुली दिवा आणि आन्या.
फराह खानची एकूण संपत्ती सुमारे 350 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. एका गाण्याचे कोरिओग्राफ करण्यासाठी ती लाखो रुपये घेत आहे. फराह आणि शिरीष यांची प्रॉडक्शन कंपनीही आहे, जिच्यामुळे त्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळते.
फराह खान सध्या टीव्हीवरील 'सेलिब्रिटी मास्टर शेफ' शोमध्ये जज म्हणून परतत आहे, ज्यामुळे तिने आणखी एक ठसा उमठवला आहे. तिच्या संघर्षातून आणि कष्टातून आलेलं यश हे तिच्या फॅन्स आणि नवोदित कलाकारांसाठी एक प्रेरणा आहे.