नवी दिल्ली : कोरोना वायरस आणि आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानची अवस्था आणखी वाईट झाली आहे. काही दिवसांपुर्वी पाकिस्तानने विश्व बॅंक आणि आशियाई विकास बॅंकेकडे नव्या कर्जाची मागणी केली होती. २ अरब डॉलरचे नवे कर्ज मागण्याची पाकिस्तानची योजना होती.
पाकिस्तानने मागितलेला निधी हा अर्थ विभा, स्टेट बॅंक ऑफ पाकिस्तान (एसबीपी), सिक्योरिटी एंड एक्सचेंज कमीशन ऑफ पाकिस्तान आणि फेडरल बोर्ड ऑफ रेवेन्यू, बाजार स्थिरता, बाजार सुविधा अशा गरजा पू्र्ण करण्यासाठी वापरण्यात येणार होता.
पाकिस्तानने वीज बील कमी करण्यासाठी देखील कर्ज घेतले होते. याचे व्याज चुकवण्यासाठी इम्रान खान सरकारने १० अरब डॉलर गोळा करत आहे. हा निर्णय पाकिस्तान कॅबिनेटच्या आर्थिक समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
पाकिस्तानातून हा निधी गोळा करण्यासाठी एक समिती देखील बनवण्यात आली आहे. निधी कसा खर्च करायचा हे देखील हीच समिती ठरवणार आहे. विजेचे दर कमी करुन ती रक्कम वळवण्याचा यांचा निर्णय होता.
चीनी प्रकल्पांमध्ये गुंतवणूक ही पाकिस्तानला महागात पडतेय. त्यामुळे देश आपली प्राथमिकता विसरलाय. यावर्षी जून पर्यंत पाकिस्तानवरील एकूण कर्ज ३७.५ ट्रिलियन होऊ शकण्याचा अंदात व्यक्त केला जातोय. ही रक्कम पाकिस्तानच्या जीडीपीच्या ९० टक्के आहे. आर्थिक बाजारातील स्थिती सुधारण्याच्या नावाखाली पाकिस्तान एडीबीकडून ३०० मिलियन अमेरिकन डॉलरचे कर्ज मागतोय.