Qin Gang Death : चीनचे माजी परराष्ट्र मंत्री आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे निकटवर्तीय किन गँग यांच्या निधनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. किन गँगचा मृत्यू संशयास्पद असल्याचे मानले जात असून त्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. किन गँगचा मृत्यू आत्महत्या किंवा टॉर्चरमुळे झाला असावा, अशी माहिती समोर येत आहे. किन गँगच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू आहे. कथित विवाहबाह्य संबंधांमुळे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी माजी परराष्ट्र मंत्री किन गँग यांना त्यांच्या पदावरून बडतर्फ केले होते. किन जूनमध्ये बेपत्ता झाले होते पण आता त्यांचे मृत्यूमुळे प्रकरण आता गुंतागुंतीचे झाले आहे.
जुलैमध्ये पदावरुन हटवण्यापूर्वी, किन गँग एका महिन्यापेक्षा जास्त काळ सार्वजनिकपणे दिसले नव्हते. त्यांच्या अनुपस्थितीबद्दल अनेक प्रकारच्या चर्चा सुरु होत्या. किन गँगचा जुलैच्या अखेरीस लष्करी रुग्णालयात मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता. देशातील आघाडीच्या नेत्यांवर या रुग्णालयात उपचार सुरु होत.
चीनच्या कम्युनिस्ट पार्टीने (CPC) माजी परराष्ट्र मंत्री किन गँगच्या कथित विवाहबाह्य संबंधांची चौकशी केली. किन गँग अमेरिकेत चीनचे राजदूत म्हणून काम करत होते. मात्र, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला होता. किन यांना काढून टाकल्याने अनेकांना आश्चर्य वाटले कारण ते शी जिनपिंग यांच्या जवळचे मानले जात होते. किन यांनी जुलै 2021 ते 2023 च्या सुरुवातीपर्यंत अमेरिकेत चीनचे राजदूत म्हणून काम केले.
किन यांना त्यांच्या 'लाइफस्टाइल'मुळे काढून टाकण्यात आले, असे सीपीसी तपासणीत म्हटले आहे. वॉल स्ट्रीट जर्नल आणि सीएनएनच्या वृत्तानुसार, हा शब्द चीनमध्ये 'लैंगिक अत्याचार'साठी वापरला जातो. 'किं गँगचे लग्न असूनही, त्यांचे कोणाशी तरी प्रेमसंबंध होते, तिच्यापासून त्यांना एक मूलही आहे.' दरम्यान अधिकाऱ्यांने महिला आणि मुलाची नावे सार्वजनिक केलेली नाहीत, असे वॉल स्ट्रीट जर्नलने आपल्या अहवालात म्हटले आहे.