आज होणाऱ्या 'त्या' भेटीमुळे चीनला फुटलाय घाम...

.....

& Updated: Jun 12, 2018, 02:15 PM IST
आज होणाऱ्या 'त्या' भेटीमुळे चीनला फुटलाय घाम... title=

बीजिंग: अवघ्या जगाचे लक्ष लागून राहिलेली ती बहुचर्चित भेट अखेर आज (१२ जून) पार पडत आहे. सिंगापूरमध्ये सँटासा बेटावरील कपैला हॉटेलमध्ये ही ऐतिहासिक भेट होईल. मात्र, या भेटीमुळे भारताचा शेजारी चीन भलताच अस्वस्थ झाला आहे. ही भेट नेमकी किती वेळ चालेल. त्यात नेमकी काय चर्चा होईल. त्याचा जगावर काय परिणाम होईल, असे सगळे कुतूहल आहेच. पण, या भेटीत आपल्याबद्दल तर काही चर्चा होणार नाही ना? या शंकेने चीन चिंतातूर झाला आहे. अर्थातच चीनला असा घाम फोडणारी ही भेट आहे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग यांच्यातील. चीन हा उत्तर कोरियाचा मित्र म्हणून ओळखला जातो.

उत्तर कोरियाने झुगारला अमेरिकेचा दबाव

अण्वस्त्र सुसज्जतेच्या आक्रमक मोहीमेमुळे उत्तर कोरिया जगभरात चर्चेत आहे. अर्थात त्याने ही मोहीम मागे घेत असल्याचे काही दिवसांपूर्वी जाहीर केले. पण, जगभरातील अनेक देशांमध्ये उत्तर कोरियाच्या या वक्तव्याबाबत अद्यापही साशंकता आहे. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारच्या जागतिक किंवा महासत्ता अमेरिका, ब्रिटन किंवा तशाच विकसित देशांच्या दबावाला भीक न घालता उत्तर कोरिया आपला अण्वस्त्र कार्यक्रम पुढे रेटत होता. त्यामुळे उत्तर कोरियाचे करायचे काय? हा प्रश्न जगाला पडला होता. अशा परिस्थितीत अवघे जग उत्तर कोरियाशी फटकून वागत होते. मात्र, त्याही स्थितीत चीन उत्तर कोरियाच्या पाठिमागे ठामपणे उभा होता. तसेच, ट्रम्प यांची भेट ठरण्यापूर्वी उत्तर किम जोंग दोन वेळा चीनला जाऊन आला होता. 

उत्तर कोरिया दूरावण्याची चीनला भीती..

दरम्यान, अशी सगळी स्थिती असताना किम जोंग ट्रम्प यांची सिंगापूरमध्ये भेट घेणार असल्याने बिजिंगमध्ये खळबळ उडाली आहे. जगाचा दबाव झुगारून ज्या उत्तर कोरियाला आपण जवळ केले. त्याला पाठिंबा दिला. तो उत्तर कोरिया अमेरिकेच्या नादी लागून आपल्यापासून दूरावणार तर नाही ना? अशी शंका चीनला वाटते आहे. चिनी तज्ज्ञांनीही ही भीती व्यक्त केली आहे.

ट्रम्प, जोंग यांच्यातील चर्चेचे संभाव्य मुद्दे

अमेरिका उत्तर कोरियासमोर आकर्षक ऑफर ठेवण्याची शक्यता 
अणुचाचणी बंदीसाठी उत्तर कोरियाला विनंती
चीनचे महत्त्व कमी करण्यावर अमेरिकेचा भर