Corona Update : जवळपास अडीच वर्षांपूर्वी कोरोना (Corona), हे प्रकरण नेमकं काय आहे याचा भयावह अनुभव साऱ्या जगानं पहिल्यांदा घेतला. पाहता पाहता या संसर्गाची लाट संपूर्ण जगभर पसरली आणि मानवी आयुष्य 360 अंशांनी बदललं. राहण्या-जगण्याच्या, खाण्यापिण्याच्या सर्व सवयी बदलल्या. कालांतरानं अथक प्रयत्नांनंतर या विषाणूच्या संसर्गाला ताब्यात ठेवणारी लस अस्तित्वात आली आणि जगाला दिलासा मिळाला. आता आपण कोरोनाच्या विळख्यातून जवळपास सुटलोच.... असं वाटताना मात्र पुन्हा एकदा हा विषाणू चिंतेत टाकण्यासाठी सज्ज झाला.
ज्या ठिकाणहून या विषाणूची पाळंमुळं पसरली असं म्हटलं गेलं, त्याच चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनानं थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. सध्याच्या घडीला 6.5 कोटींहून अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करावं लागत आहे. (china imposed Covid rules people not allwoed to hangout even on holidays )
इतकंच काय, तर कोविड (Covid 19) नियमामंअंतर्गत येत्या काही दिवसांमध्ये चीनची राष्ट्रीय सुट्टी येत आहे. पण, त्या दिवशीसुद्धा देशात नागरिकांना प्रवासबंदीचे निर्देश देण्यात आले आहेत. सुट्ट्यांच्या दिवशीही इथं नागरिकांना घराबाहेर पडण्याची परवानगी नाही.
सुट्ट्यांना घबाराहेर No Entry
काही दिवसांतच चीनमध्ये ल्यूनर न्यू ईयर सुरु होणार आहे. ज्यासाठी देशात 10-12 सप्टेंबरपर्यंत सुट्टी (Holidays) असेल. पण, गर्दी वाढली तर संसर्ग पुन्हा फोफावेल ही भीती अधोरेखित करत सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षानं या निर्बंधांची गरज असल्याचं स्पष्ट केलं.
वाचा : आता आवाजावरून समजणार तुम्ही Corona Positive आहात की नाही?
साडेसहा कोटी नागरिक Lockdown मध्ये
चीनमधील एका व्यावसायिक मासिकात छापून आलेल्या माहितीनुसार सध्याच्या घडीला इथं 33 शहरांमध्ये संपूर्ण आणि आंशिक लॉकडाऊन (Lockdown in china) लागू करण्यात आला आहे. याचा थेट परिणाम 6.5 कोटी नागरिकांवर झाला आहे. जणूकाही नागरिक स्वत:च्याच घरात नजरकैदेत आहेत.