बीजिंग : जगातील महासत्ता बनण्यासाठी चीन नेहमीच आपलं शक्तीप्रदर्शन करत आहे. आता पून्हा एकदा चीनने असं काही केलं आहे की ज्यामुळे जगभरातील इतर देशांची चिंता वाढली आहे.
चीनने एक असं जहाज बनवलं आहे जे संपूर्ण आशिया खंडातील सर्वात मोठं जहाज आहे. हे जहाज कृत्रिम बेट तयार करण्यासाठी बनवलं आहे.
चीनमधील सरकरी वृत्तपत्र चायना डेलीने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी चीनमधील जियांग्सूमध्ये या जहाजाचं अनावरण करण्यात आलं.
या जहाजाची निर्मिती दक्षिणी चीनमधील सागरात केली आहे. 'तियान कुन हाओ' (मॅजिक आयर्लँड मेकर) या जहाजाची एका तासात ६,००० घन मीटर खोदण्याची क्षमता आहे. याचं क्षेत्रफळ तीन तलावांच्या बरोबरीचं आहे.
दक्षिण चीन समुद्रात या जहाजाला तैनात केलं जाऊ शकतं. ज्या ठिकाणी पूर्वीपासूनच अमेरिका, भारतासोबत इतरही देशांसोबत वाद सुरु आहे. चीनमधील सरकारी वृत्तपत्रानुसार, हे एक असं जहाज आहे ज्याचा वापर लँड रिक्लेमेशनसाठी केलं जातं. या जहाजाच्या माध्यमातून कृत्रिम बेट तयार करण्यासाठी केला जाणार आहे.
ग्लोबल टाईम्सच्या अहवालानुसार, चीनचं आपल्या किनारपट्टीवरील भागात लँड रिक्लेमेशन प्रोजेक्ट सुरु केला आहे. त्यातच आता या जाहाजाच्या निर्मितीमुळे चीन आणखीन आक्रमकता दाखवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.