Secret Spacecraft Shenlong : चीनने पुन्हा एकदा संपूर्ण जगाचे टेन्शन वाढवाणारे कृत्य केले आहे. चीनने एक सिक्रेट स्पेसक्राफ्ट लाँच केले आहे. या स्पेसक्राफ्टच्या माध्यामातून चिनने अंतराळात 6 अज्ञात वस्तू पाठवल्या आहेत. या वस्तूंच्या माध्यमातून चिनला काय नेमके काय साध्य करायचे आहे याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. यातून एक प्रकारचे सिग्नल येत आहेत. मात्र, नक्कीच ही चीनची ही कोणती तरी गुप्त मोहिम असल्याचा दावा केला जात आहे.
शेनलॉन्ग असे चीनच्या या सीक्रेट स्पेस प्लेनचे (Secret Spacecraft Shenlong) नाव आहे. शेनलाँग याला इंग्रजीत डिव्हाईन ड्रॅगन असे म्हणतात. चीनचे हे सिक्रेट स्पेसक्राफ्ट अमेरिकन विमान X-37B सारखे दिसते. पण, हे रोबोटिक स्पेसक्राफ्ट आहे. सॅटेलाइट ट्रॅकर आणि खगोलशास्त्रज्ञ स्कॉट टिली यांनी त्यांच्या दुर्बिणीतून स्पेसक्राफ्टसह अंतराळात सोडलेल्या या गुप्त वस्तू पाहिल्या आहेत. चीन नेमकं काय करत आहे हे माहित नाही. मात्र, त्यांच्या या गुप्त यानाने या सहा गोष्टी अवकाशात सोडल्या आहेत अशी माहिती स्कॉट यांनी दिली.
सिक्रेट स्पेसक्राफ्टमधून अंतराळता सोडलेल्या या सहा अज्ञात वस्तूंच्या माध्यमातून चीन जगाची हेरगिरी करत असल्याचा आरोप केला जात आहे. किंवा चीनचा हा वैज्ञानिक प्रयोग असू शकतो अशी देखील शक्यता व्यक्त केली जात आहे. या स्पेसप्लेनमधून बाहेर पडणाऱ्या गोष्टी एस-बँड सिग्नल पाठवत असल्याचा दावा स्कॉट यांनी केला जात आहे. बहुतेक सिग्नल ऑब्जेक्ट A मधून येत आहेत. बाकी B, C, D, E आणि F यांच्या मार्फत अद्याप कोणत्याही प्रकारचे सिग्न आलेले नाहीत. चीन वापरत असलेल्या फ्रिक्वेन्सी सिग्नलद्वारे ते कोणत्यातरी देशाच्या विमानसेवेचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा खगोलशास्त्रज्ञांचा दावा आहे.
चीनने हे केलेले कृत्य पहिल्यांदाच केलेले नाही. यापूर्वी देखील चीनने असे उद्योग केलेले आहेत. 2020 आणि 2022 मध्येही चीनने अज्ञात वस्तू अवकाशात पाठवल्या होत्या. चीनचे Secret Spacecraft Shenlong हे 276 दिवस पृथ्वीभोवती फिरून परतले आहे. 8 मे 2023 रोजी चीनचे हे स्पेसक्राफ्ट परत आले. या रहस्यमयी स्पेसक्राफ्टचे फोटो देखील चीनने कधीच प्रसिद्ध केले नाहीत. चीनचे हे स्पेसक्राफ्ट अमेरिकन स्पेसक्राफ्ट X-37B सारखेच असल्याचे सांगण्यात येत आहे. चीनच्या या रहस्यमयी स्पेसक्राफ्टची माहिती फक्त अमेरिकेकडेच आहे. यूएस स्पेस फोर्सच्या 18 व्या स्पेस डिफेन्स स्क्वाड्रनने चीनच्या या गुप्त मोहिमेची प्रसिद्ध केली आहे.