Cosmic Christmas Tree Shining In Space: जगभरात सध्या नाताळचा उत्साह आहे. भारतातही काही भागात नाताळसाठी बाजारपेठा सजल्या आहेत. भारतातर नाताळाची धूम पाहायला मिळतेच पण जगभरात दिवाळीप्रमाणे नाताळ साजरा केला जातो. आठवडाभर आधी उत्सावाची तयारी केली जाते. अवकाशातही नाताळाची छबी पाहायला मिळतेय. नासाने एक फोटो शेअर करत कोट्यवधी लोकांचा आनंद द्विगुणित केला आहे.
नाताळाला अवघे काही दिवस शिल्लक असताना नॅशनल एरोनॉटिकल अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) ने अवकाशात साकार झालेल्या ख्रिसमस ट्रीचा फोटो शेअर केला आहे. नासाच्या उपग्रहाने एनजीसी 2264 चा एक फोटो शेअर केला आहे. यात ख्रिसमस ट्री क्लस्टर रुपात दिसत आहे. ख्रिसमसच्या काही दिवस आधीच नासाने हा फोटो जारी केला आहे. या फोटोत ख्रिसमस ट्री दिसल्याचा भास होतोय.
नासाच्या मते, एनसीजी 2264 मध्ये एकापेक्षा पाच मिलियन जुने तारे आहेत आणि आपल्या पृथ्वीच्या शेजारीच सौरमंडळात हा अद्भूत चमत्कार दिसत आहे. अंतरिक्ष एजन्सीच्या मते, एनसीजी 2264 चे तारे आकाराने भिन्न आहेत. त्यातील काही तारे आपल्या सौरमंडळातील ताऱ्यांपेक्षा लहान आहेत. यांचा आकार सूर्याचे द्रव्यमान ते सौर द्रव्यमानाच्या आकाराने सात पट मोठा असतो. नासाने हा फोटो चंद्रा एक्स रेच्या माध्यमातून कैद केला आहे.
It's beginning to look a lot like cosmos.
Our @ChandraXray Observatory recently spotted the blue-and-white lights that decorate the "Christmas Tree Cluster," a swarm of stars and gas some 2,500 light-years from Earth: https://t.co/VT2WaLgp77 pic.twitter.com/HrnrmxRyd7
— NASA (@NASA) December 19, 2023
चंद्रा एक्सरेने नॅशनल सायन्स फाउंडेशनच्या WIYN 0.9 मीटर टेलीस्कोपच्या ऑप्टिकल डेटाच्या माध्यमातून हे फोटो पाठवले आहेत. तर चित्राच्या आजूबाजूला दिसणारे तारे टू मायक्रोन ऑल स्काय सर्वे इन्फारेड डेटाचे आहेत. एनजीसी 2264 आपल्या आकाशगंगेमध्येच स्थित आहेत आणि पृथ्वीपासून जवळपास 2500 प्रकाशवर्षे अंतरावर आहेत.