नवी दिल्ली : भारताचे ज्येष्ठ अनुसंशोधक डॉ. होमी भाभा यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमागे अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा 'सीआयए'चा हात होता का? असा प्रश्न आता निर्माण झालाय.
TBRNews.org नावाच्या एका न्यूज वेबसाईटडनं असे संकेत दिलेत. या वेबसाईटच्या म्हणण्यानुसार, ज्या विमान अपघातात डॉ. भाभा यांचा मृत्यू झाला होता तो अपघात झाला नव्हता... तर घडवून आणला गेला होता... आणि तोही 'सीआयए'नं...
TBRNews नं आपल्या बातमीत ११ जुलै २००८ रोजी पत्रकार ग्रेगरी डगलस आणि सीआयए ऑफिसर रॉबर्ट क्राओली यांच्यात झालेलं संभाषण छापलंय. यात क्राओली म्हणतात, 'भारतात ६० च्या दशकात अणुबॉम्बवर काम सुरू झालं होतं. जी आमसाठी एक मोठी समस्या होती'... हे सगळं भारत रशियाच्या मदतीमुळे करू शकत होता, असा रॉबर्टचा रोख आहे.
या संभाषणात क्राओली यांनी जहांगीर भाभा यांचा उल्लेख करताना त्यांना 'धोकादायक' म्हटलंय. भाभा ज्यासाठी वियन्नाच्या दौऱ्यावर होते त्यामुळे अमेरिकेची डोकेदुखी आणखी वाढली असती... असंही रॉबर्टनं म्हटलंय.
ही घटना जानेवारी १९६६ ची आहे जेव्हा एअर इंडियाचं बोइंग ७०७ या विमानाला अपघात झाला होता. याच विमानातील कार्गोमध्ये ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट झाला होता. मुंबईहून न्यूयॉर्कला जात असलेल्या या विमानात माऊंट ब्ला जवळ हा अपघात झाला आणि त्यात ११७ जणांचा मृत्यू झाला होता... त्यापैंकीच एक डॉ. होमी भाभाही होते. एका कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्यासाठी ते वियन्नाला निघाले होते.