Crocodile Python Fight : अजगर हा जगातील सर्वात धोकादायक शिकारी मानला जातो. अजगर हा नीलगायसारख्या मोठ्या प्राण्यालाही गिळंकृत करु शकतो एवढा धोकादायक शिकारी प्राणी आहे. मात्र आपला जीव वाचवण्यासाठी प्रत्येक प्राणी हा महाकाय अजगारासोबतही लढायला तयार होऊ शकतो याचं एक उदाहरण समोर आलं आहे. एका अजगरालापाण्यातील सर्वात धोकादायक शिकारी मगरीशी लढणं चांगलेच महागात पडलं आहे. याचा धक्कादायक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. मगरीची आपण सहज शिकार करु असे समजण्याची चूक अजगराने केली. मात्र काही मिनिटांनी आपण चुकीचे पाऊल उचलल्याचे अजगराला समजलं.
बहुतेक वन्य प्राणी मांसाहारी असतात आणि अन्नासाठी इतर प्राण्यांची शिकार करतात. जंगलात एकाच ठिकाणी अनेक प्रकारचे प्राणी राहत असल्याने ते आपापसात भांडतात आणि आपल्या अन्नाची सोय करतात. असाच काही प्रयत्न एका अजगराने केला होता. मात्र त्याचा हा प्रयत्न बऱ्यापैकी फसलेला दिसला. या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बर्मीज प्रजातीचा अजगर भक्ष्याच्या शोधात पाण्यात उतरला होता. त्याला वाटलं की इथे शिकार सापडेल आणि सहज पोट भरेल. मात्र नंतर तो मगरीसमोर आला. मगरीला पाहताच अजगराने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याच्या अंगाशी स्वतःला गुंडाळायला सुरुवात केली. मात्र मगरीने जोरदार प्रत्युत्तर दिलं.
एका वाईल्ड लाईफ व्हिडिओग्राफरने हा रोमांचक क्षण त्याच्या कॅमेरामध्ये टिपला होता. यामध्ये एक अजगर मगरीशी झुंजताना दिसत होता. खरं तर अजगर आणि मगरी यांच्यात जोरदार लढत झाली. माध्यमांच्या वृत्तानुसार, ही झुंज अॅलिसन जोस्लिन नावाच्या फोटोग्राफरने कॅमेऱ्यात कैद केली आहे. हा व्हिडिओ त्याने फेसबुकवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये, अजगर या लढाईत वरचढ होण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. सरतेशेवटी, मगर अजगराला गिळताना दिसते. शेवटी अजगर खूप मोठा असल्याने मगर ही प्रक्रिया थांबवतो.
अॅलिसन जोसलून ही पहाटे सायकलवरून फिरायला बाहेर पडली होती. तेव्हा अचानक तिला तलावात काही हालचाल जाणवली. जवळ जाऊन पाहिल्यावर तिला दहा फूट लांबीचा अजगर आणि मगर यांच्यात भांडण सुरू असल्याचे दिसून आले. या लढतीत कधी अजगर वर्चस्व गाजवत होता. तर कधी मगरीने अजगराला पकडले होते. शेवटी अजगराचा पराभव झाला आणि मगरीने त्याला खाऊन टाकले.
CAUGHT ON CAMERA: A reptile rumble was caught on camera in the Everglades. A woman captured the moments between an alligator and a python. https://t.co/XUTO1GfBTh pic.twitter.com/b7X8KEx9ih
— WSVN 7 News (@wsvn) April 6, 2023
हा व्हिडिओ फ्लोरिडातील एव्हरग्लेड्स नॅशनल पार्कमधला होता. "आज एव्हरग्लेड्समधील शार्क व्हॅलीमध्ये सायकल चालवताना हे दृश्य पाहिले. एव्हरग्लेड्सला घाबरवणारा हा एक अजगर आहे. अजगर खूपच सुस्त होता आणि मी विचार करत होतो की ही थंडी असू शकते त्यामुळे तसा थांबला असेल. पण मगरीने त्याला चावलं होतं. तो अजगर गिळायला लागला आणि तो खूप मोठा असल्याने त्याला थांबवावे लागले," असे व्हिडिओग्राफर अॅलिसन जोसलूनने फेसबुकवर व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे.
दरम्यान, बर्मीज अजगर हा फ्लोरिडामध्ये आढळणाऱ्या सापांच्या सर्वात मोठ्या प्रजातींपैकी एक आहे. ते संरक्षित नाहीत. तसेच जमीन मालकाच्या परवानगीने खाजगी मालमत्तेवर आढळल्यास मारले जाऊ शकतात.