अबूधाबी : गॅंगस्टर आणि दाऊद इब्राहिमचा राईट हॅंड छोटा शकिलचा भाऊ अन्वर बाबू शेखला अबूधाबी विमानतळावर अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. या अटकेमुळे दाऊदला मोठा झटका बसलाय. दरम्यान, अन्वर बाबू शेखवर पाकिस्तानी आयएसआयच्या मदतीने भारतात दहशतवाद पसरवण्याता आरोप आहे.
अन्वरवर नेमक्या कोणत्या कारणाने अटक करण्यात आलेय याची माहिती देण्यात आलेली नाही. तसेच याचे कारणही अद्याप स्पष्ट झालेले नाही. अन्वर शेखला अटक करण्यात आल्यानंतर त्याचा ताबा मिळवण्यासाठी भारतीय आणि पाकिस्तानी यंत्रणांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.
अन्वरकडून पाकिस्तानचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. अन्वर पाकिस्तानच्या आयएसआयच्या मदतीने भारतात दहशतवाद पसरवत होता असा आरोप आहे. याआधी त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आली आहे. नव्हेंबर २०१६ मध्ये अन्वर बाबू शेखला अबू धाबी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. तसेच तो बनावट पासपोर्टवर प्रवास करत असल्याच समोर आलं होते.