Wonders Of World: जगातील सात आश्चर्यांबाबत बहुतांश लोकांना माहिती आहे. सातही ठिकाणं त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे प्रसिद्ध आहेत. इजिप्तमधील पिरामिड, चीनमधील ग्रेट वॉल ऑफ चायना, जॉर्डनमधील पेट्रा, मेक्सिकोमधील चिचेन इत्झा, पेरूमधील माचू पिचू, भारतातील ताजमहाल आणि ब्राझालमधील ख्रिस्ट दी रेडिमीर यांचा समावेश आहे. आता या सात आश्चर्यांमध्ये आठव्या आश्चर्याची भर पडणार आहे. सौदी अरबमध्ये 'द लाइन' शहर तयार केलं जात आहे. मोठमोठ्या यंत्रांच्या साह्याने शहर उभारणीचे काम सुरू आहे. वाळवंटात उभारल्या जाणाऱ्या या शहराची लांबी सुमारे 170 किमी असेल. तसेच रुंदी सुमारे 200 मीटर असणार आहे. हे शहर एका सरळ रेषेत बांधले जाईल आणि इतर शहरांशीही जोडले जाईल. येथे इमारतींची उंची 500 मीटर असेल. या शहरात राहणाऱ्या लोकांना एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यासाठी 20 मिनिटे लागतील.
'द लाइन' नावाचे हे शहर आतापर्यंत केवळ कागदावरच होते, परंतु अलीकडे त्यासाठी जमिनीच्या पातळीवर काम सुरू झाले आहे. शहर उभारण्यासाठी कमी जमिनीचा वापर केल्यास जगाला अनेक फायदे होतील, असे सांगण्यात येत आहे. क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी या प्रकल्पासाठी 500 अरब डॉलर्सचे बजेट ठेवले आहे. हे जगातील आठवं आश्चर्य असेल असं सांगितलं जात आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सुमारे 40 लाख कोटी डॉलर्स खर्च होऊ शकतात.
The Line, Mega City Arab Saudi
Dimension L 170 km x W 200 m x H 500 m
Avaiable for 9 Million Residence
Zero Carbon
Renewable Water and Anergy pic.twitter.com/WtZSJYpUoz— Rusfianto (@rusfianto) October 24, 2022
सध्या या प्रकल्पाचे काम सुरु असून एका मासिकाने फुटेज प्रसिद्ध केले आहेत. फुटेजमध्ये मोठमोठी मशीन्स वाळवंटात काम करताना दिसत आहेत. हा प्रकल्प मानवी क्षमता, तंत्रज्ञान आणि वर्तमान जीवनशैली याबाबत सांगतो.