Elon Musk News: ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी ट्विटरने (Twitter Deal) नोकरीवरून काढलेल्या कर्मचाऱ्यांना परत बोलावलं आणि एलॉन मस्क यांची चांगलीच नाचक्की झाली होती. त्यानंतर आता त्यांच्या एका ट्विटमुळे संपुर्ण अमेरिकेच खळबळ उडाली आहे.
सोमवारी एलॉन मस्क यांनी एक ट्विट (Elon Musk Twitter) केलं. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी राजकीय डावपेच आखल्याची चर्चा सुरू झाली आहे. 8 नोव्हेंबरच्या मध्यावधी निवडणुका (US Midterm Elections) होणार आहे. अमेरिकन लोकांनी रिपब्लिकन पक्षाला मतदान करावं, असं एलॉन मस्क यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या ट्विटनंतर मोठा वाद उभा राहिला आहे.
मी रिपब्लिकन काँग्रेसला मतदान करण्याची आवाहन करतो कारण अध्यक्षपद डेमोक्रेटिक पक्षाकडे आहे, असं मस्क म्हणाले. कट्टर डेमोक्रॅट्स किंवा रिपब्लिकन कधीही दुसऱ्या बाजूला मत देत नाहीत, म्हणून स्वतंत्र मतदार हेच ठरवतात की कोण प्रभारी आहे, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.
दरम्यान, अमेरिका येत्या 8 नोव्हेंबर रोजी सिनेट आणि हाऊस ऑफ काँग्रेससाठीच्या मध्यावधी निवडणुकांना (US Midterm Elections) सामोरं जाणार आहे. मस्क हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थक आहेत. अनेकदा त्यांनी ही गोष्ट बोलून देखील दाखवली. त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या व्याख्येत हे ट्विट बसतंय का?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.