Nostradamus Predictions for 2022: फ्रान्सचा महान भविष्यवेत्ता नास्त्रेदमस यांनी भविष्यातील अनेक घटनांबाबत आधीच भाकीत केलं आहे. त्यांनी केलेली काही भाकीतं तंतोतंत खरी ठरली आहेत. त्यामुळे भविष्यवेत्ता नास्त्रेदमस यांचं जगात वेगळं स्थान आहे. नास्त्रेदमसचा जन्म 14 डिसेंबर 1503 रोजी जर्मनीमध्ये झाला होता आणि 2 जुलै 1566 रोजी मृत्यू झाला होता. आतापर्यंत त्यांनी हिटलरची राजवट, दुसरे महायुद्ध, 9/11 चा हल्ला आणि फ्रेंच राज्यक्रांती यासह काही भाकीतं केली होती. त्यापैकी 85 टक्के भाकीतं खरी ठरली आहेत. त्यामुळे त्यांच्या भविष्य कथनाबाबत लोकांमध्ये उत्सुकता असते. 500 वर्षांपूर्वी नास्त्रेदमस यांनी 2022 सालात काय घटना घडतील? याबाबत सांगितलं आहे. हे वर्ष संपण्यासाठी अजून पाच महिन्यांचा कालावधी आहे.
यावर्षी अणुबॉम्बचा स्फोट होण्याची शक्यता
2022 च्या संदर्भात, नास्त्रेदमसने आपल्या भविष्यवाणीत सांगितले आहे की, या वर्षात अणुबॉम्बचा स्फोट होईल, ज्यामुळे हवामान बदल होईल. एवढेच नाही तर अणुबॉम्बच्या स्फोटामुळे पृथ्वीची स्थितीही बदलू शकते.
महागाईचा अंदाज
नास्त्रेदमस यांनी 500 वर्षांपूर्वी 2022 च्या महागाईचा अंदाजही वर्तवला होता. नास्त्रेदमसने वर्तवल्याप्रमाणे यंदा महागाई नियंत्रणाबाहेर जाईल. याशिवाय अमेरिकन डॉलरच्या दरातही मोठी घसरण होईल. यासोबतच त्यांनी म्हटले आहे की, 2022 मध्ये लोक सोने, चांदी आणि बिटकॉइनमध्ये जास्त पैसे गुंतवतील.
लघुग्रहामुळे नुकसान होईल
नास्त्रेदमसच्या अंदाजानुसार, 2022 मध्ये लघुग्रहामुळे पृथ्वीचे मोठे नुकसान होणार आहे. एक मोठा खडक समुद्रात पडेल, ज्यामुळे भयंकर लाटा उसळतील आणि पृथ्वीला चारही बाजूंनी घेरतील. समुद्राच्या पाण्यामुळे पृथ्वीचे मोठे नुकसान होईल.
वादळामुळे फ्रान्समध्ये विध्वंस होईल
नास्त्रेदमस यांच्या भाकीतानुसार, फ्रान्समध्ये या वर्षी एक मोठे वादळ येणार आहे, ज्यामुळे जगातील अनेक भागांमध्ये भीषण आगीसोबतच दुष्काळ आणि पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते.
72 तासांचा अंधाराने संपूर्ण जग व्यापेल
नास्त्रेदमस यांनी आपल्या भविष्यवाणीत सांगितले आहे की, 2022 मध्ये प्रचंड विनाशानंतर शांतता येईल. परंतु या शांततेपूर्वी संपूर्ण जग 3 दिवस म्हणजेच 72 तास अंधारात असेल.
आर्टिफिशियल इंटेलिजेंसचे मानवावर नियंत्रण असेल
नास्त्रेदमसच्या भविष्यवाणीनुसार, 2022 मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंसचे मानवजातीवर नियंत्रण असेल आणि वैयक्तिक संगणकाचा मेंदू मानवांवर नियंत्रण ठेवण्यास सक्षम असेल. तसेच रोबोट मानव जातीचा नाश करतील.