नवी दिल्ली : भूकंपानंतर ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांचे प्राण आता उंदीर वाचवतील. हे ऐकायला विचित्र वाटेल पण हे अगदी खरे आहे. एका शास्त्रज्ञाने अशी प्रणाली विकसित केली आहे, ज्याच्या मदतीने उंदीर ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांना शोधू शकतात.
भूकंप, पूर, सुनामी यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे दरवर्षी अनेकांना जीव गमवावा लागतो. कधीकधी भूकंपानंतर, ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांना शोधणे खूप कठीण होते. अशा परिस्थितीत आता उंदरांमुळे लोकांचे प्राण वाचण्यास मदत होणार आहे. खरं तर, टांझानियन शास्त्रज्ञाने अशी प्रणाली विकसित केली आहे, ज्याच्या मदतीने उंदीर ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांना शोधू शकतात.
ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांचे प्राण वाचवतील
यासाठी आफ्रिकेतील शास्त्रज्ञ आणि अपोपो नावाच्या एनजीओने उंदरांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. या उंदरांच्या पाठीवर एक पिशवी टांगली जाणार आहे. या बॅगेत मायक्रोफोन, व्हिडिओ डिव्हाइस आणि लोकेशन ट्रॅकर ठेवण्यात येणार आहे. या गोष्टींद्वारे बचाव कर्मचारी ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांशी संपर्क साधू शकतील. याद्वारे, त्यांचे स्थान शोधून, ते त्यांचे प्राण वाचवू शकतील.
7 उंदरांना प्रशिक्षण
या प्रकल्पाच्या प्रमुख Dr Donna Kean यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पासाठी आतापर्यंत 7 उंदरांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या उंदरांनी केवळ दोन आठवड्यांत पूर्ण कार्य शिकले आहे. प्रकल्पासाठी निवडलेले उंदीर आफ्रिकेत आढळणाऱ्या उंदरांच्या प्रजातीचे आहेत. त्यांना 'Hero Rats' असे नाव देण्यात आले आहे. हे उंदीर लवकर शिकतात म्हणून निवडले आहेत. यासोबतच या उंदरांमध्ये वास घेण्याची क्षमताही जास्त असते. हे उंदीर अगदी लहान ठिकाणीही सहज प्रवेश करतात.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर उंदीर तुर्कीला जातील
डॉ कीन यांनी न्यूजवीकला सांगितले की, या प्रोजेक्टसाठी एकाच वेळी 170 उंदरांना प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर, उंदरांना शोध आणि बचाव पथकासोबत काम करण्यासाठी तुर्कीला पाठवले जाईल, जेथे भूकंप वारंवार नोंदवले जातात.
I train these clever creatures to save victims trapped in collapsed buildings after earthquakes. We kit them out with a rat backpack, and train them to trigger a switch when they find a victim & come back for a tasty treat #herosnotpests #science #weirdjobs #WomenInSTEM pic.twitter.com/728IQv70NX
— Dr Donna Kean (@donnaeilidhkean) May 26, 2022