हेंगियीसा : चलन हा कोणत्याही देशातील अत्यंत महत्तवाचा घटक. कारण, त्याशिवाय व्यवहारच पूर्ण होऊ शकत नाही. म्हणूनच प्रत्येक देश चलन सुरक्षेसाठी कठिबद्ध असतो. म्हणूनच तर, बँका, लॉकर अशा व्यवस्था निर्माण झाल्या ना. पण, असाही एक देश आहे. ज्या देशात चक्क पैशांचाच बाजार भरतो. लोक रस्त्यावर पैसे घेऊन विकायला बसतात. इथे राजरोसपणे पैसे खरेदी आणि विक्रीही केले जातात. तुम्ही जर पैसे खरेदी करायला गेलात तर, विक्रेता पोते उघडून म्हणतो बोला? 'किती किलो देऊ'.
राजरोसपणे पैसे विक्रीचा बाजार भरत असलेल्या देशाचे नाव आहे, सोमालिलँड. हा देश आफ्रिकेजवळ आहे. महत्त्वाचे असे की, या देशाला ना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे, ना या देशाकडे स्वत:चे असे कोणते काम आहे. उंटाची निर्यात आणि अल्पसे पर्यटन इतकाच काय ते या देशाचे उत्पनाचे साधन.
या देशाचे चलन शिलिंग असे असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात शून्य किंमत आहे. या देसात ५०० आणि १००० रूपयांच्या मोठ्या नोटाच चालतात. येथील रस्त्यावर नोटा विक्रीची दुकाने राजरोसपणे चालतात. सोमालिलँडमध्ये तुम्हाला एका डॉलरमागे ९००० शिलिंग मिळतात. जर तुम्ही १० डॉलर दिले तर, तुम्हाला इथे ५० किलो शिलिंग मिळतात.