नवी दिल्ली: कोरोनाचं संकट आता नियंत्रणात येत असतानाच धक्कादायक बातमी समोर येत आहे. एकीकडे भारतात डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरियंटचा तिसऱ्या लाटेसोबत धोक असताना एका देशात तब्बल या व्हेरिएंटनं 800 जणांचा बळी घेतला आहे. डेल्हा व्हेरिएंट काळच बनून आला असं म्हणावं लागेल. या घटनेमुळे जगभरात खळबळ माजली आहे.
इंडोनेशियामध्ये डेल्टा व्हेरियंट काळ बनला आहे. या व्हेरिएन्टमुळे 800 हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. या देशात डेल्टाचा धोका सर्वाधिक लहान मुलांनाच असल्याचं दिसत आहे. त्यामुळे जगभरात आता चिंता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मृतांमध्ये 5 वर्षांहून लहान मुलांचा समावेश आहे. जगाच्या तुलनेत इंडोनेशियात मुलांचे जादा बळी गेला आहे. त्यामुळे आता लहान मुलांसाठी कोरोनाचा धोका वाढल्यांच दिसत आहे.
भारतातही तिसऱ्या लाटेचा धोका आहे. त्यामुळे ही परिस्थिती पाहता आता भारतातही लहान मुलांची अधिक काळजी घेणं गरजेचं ठरणार आहे. कारण डेल्टा व्हेरिएन्ट या चिमुकल्यांसाठी जीवघेणा ठरू नये यासाठी पालकांनी सजग राहायला हवं आहे.