मुंबई : प्रियकराच्या मदतीने आईची हत्या करणाऱ्या महिलेला अमेरिकेत पाठवण्यात आले आहे. इंडोनेशियन सरकारने या महिलेची तुरुंगातून सुटका केल्यानंतर तिला परत पाठवले. महिलेने आईची हत्या केली तेव्हा ती स्वतः गर्भवती होती. तिने आईचा मृतदेह सुटकेसमध्ये ठेवून लपविण्याचा प्रयत्न केला, मात्र ती यशस्वी होऊ शकली नाही. यानंतर न्यायालयाने तिला दोषी ठरवून कारागृहात रवानगी केली. मात्र, चांगल्या वागणुकीमुळे तिची लवकर सुटका झाली.
'डेली स्टार'च्या वृत्तानुसार, हीथर मॅकने इंडोनेशियातील बाली येथील एका आलिशान हॉटेलमध्ये प्रियकरासोबत तिच्या आईची हत्या केली. वास्तविक, आई आणि मुलीमध्ये वाद सुरू असताना प्रियकर तेथे पोहोचला आणि त्याने एक जड ट्रे उचलून प्रेयसीच्या आईच्या डोक्यावर मारला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने व जास्त रक्तस्त्राव झाल्याने पीडितेचा जागीच मृत्यू झाला. यानंतर मुलगी आणि तिच्या प्रियकराने आईचा मृतदेह एका सुटकेसमध्ये भरून हॉटेलमधून नेला आणि बाजूला ठेवला.
आईला मुलीचा प्रियकर आवडत नव्हता
आई आणि मुलीच्या भांडणाचे कारण होते मुलीचा प्रियकर. वास्तविक, हीदर मॅकचे प्रियकराशी आपले नाते जोडणे आईला आवडले नाही. यापूर्वीही यावरून दोघांमध्ये भांडण झाले होते. मुलगी प्रियकराच्या मुलाची आई होणार असल्याचे हॉटेलमध्ये आईला समजताच ती रागाने लाल झाली. यावरून सुरू झालेला वाद आईच्या मृत्यूनंतर संपला. त्यानंतर दोन्ही मारेकऱ्यांनी मिळून मृतदेहाची विल्हेवाट लावली. त्यांनी आधी मृतदेह सुटकेसमध्ये ठेवला, नंतर तो टॅक्सीने नेला आणि फेकून दिला.
10 वर्षांची शिक्षा
घटनेच्या वेळी गर्भवती हीदर मॅकने तुरुंगातच मुलाला जन्म दिला होता. आता दोघांना अमेरिकेत परत पाठवण्यात आले आहे. न्यायालयाने खून करणाऱ्या मुलीला 10 वर्षांची तर तिच्या प्रियकराला 18 वर्षांची शिक्षा सुनावली होती. तुरुंगात तिच्या चांगल्या वागणुकीमुळे हीदरची काही वर्षांपूर्वीच सुटका झाली आहे. हिदर मॅकला तिच्या कृत्याबद्दल कोणताही पश्चाताप नव्हता. आईच्या सल्ल्यानंतर ही ती प्रियकराला सोडायला तयार नव्हती.