जपानमध्ये मध्यावधी निवडणुका, कनिष्ठ सभागृह बरखास्त

जपानमध्ये राजकीय भूकंप झालाय. पंतप्रधान शिंजो आबे यांनी संसदेचे कनिष्ठ सभागृह बरखास्त करत मध्यावधी निवडणुकी संकेत दिलेत. या निवडणुका २२ ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे.  

Updated: Sep 28, 2017, 03:00 PM IST
जपानमध्ये मध्यावधी निवडणुका, कनिष्ठ सभागृह बरखास्त title=

टोकिओ : जपानमध्ये राजकीय भूकंप झालाय. पंतप्रधान शिंजो आबे यांनी संसदेचे कनिष्ठ सभागृह बरखास्त करत मध्यावधी निवडणुकी संकेत दिलेत. या निवडणुका २२ ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे.  

जपानचे कनिष्ठ सभागृह बरखास्त करण्यात येत असल्याची घोषणा सभागृहाचे अध्यक्ष ताडामोरी ओशिमा यांनी केली. हा निर्णय पंतप्रधान आबे यांचे सत्तारुढ लिबरल-डेमोक्रॅटिक पक्षावर पकड मजबूत करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे म्हटले जात आहे.

जपानचे कनिष्ठ सभागृहाचे कामकाज पुढील वर्षापर्यंत चालणार होते. मात्र, एक वर्ष आधीच ते बरखास्त करण्यात आलेय. पंतप्रधानपदी कायम राहण्यासाठी त्यांनी ही रणनिती आखली असल्याचे सांगितले जात आहे.

जपानमध्ये राजकीय घडामोडींना वेग येत आहे. सध्याच्या सत्ताधारी पक्षासमोर टोकिओच्या गव्हर्नर युरिको कोइके यांच्या नव्या पक्षाचे आव्हान आहे. युरिको यांनी अलिकडेच 'पार्टी ऑफ होप' या नव्या राजकीय पक्षाची स्थापना केलेय. 

दरम्यान, त्यांनी उत्तर कोरियाविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतल्याने सध्या त्यांना पाठिंबा मिळत आहे. विरोधक कमकुवत झाले आहेत. मध्यावधी निवडणुकांमध्ये याचाच फायदा उठवण्याचा आबे यांचा प्रयत्न  केलाय. निवडणुकीत सत्ताधारी एलडीपीला बहुमत मिळेल, असा अंदाज मतदानपूर्व चाचण्यांतून वर्तविण्यात आलाय.