तुम्ही बेरोजगार आहात? तुम्हाला काम करायलाही आवडत नाही? पण तरीही ही नोकरी (Job) तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. धक्का बसला असेल ना? तर मग आश्चर्यचकित होऊ नका. एक व्यक्ती अशीही आहे ज्याला काम न करण्याचाच पगार मिळत आहे.
जपानच्या शोजी मोरिमोटोला काहीही न करण्याबद्दल त्याची कंपनी मोठी रक्कम देते (Japanese man who earns a living by being rented to do nothing). शोजी मोरिमोटोचे काम फक्त ग्राहकांसोबत वेळ घालवणे आहे. प्रत्येक मीटिंगसाठी त्याला 10,000 येन म्हणजेच 71 डॉलर मिळतात.
"मुळात मी स्वतःला भाड्याने देतो. माझे काम माझे क्लायंट मला सांगतील तिथेच राहायचे आहे. या काळात मला काहीही करायचं नसतं," असे टोक्योमध्ये राहणाऱ्या मोरिमोटोने रॉयटर्सला सांगितले. गेल्या चार वर्षात शोजी मोरिमोटोने सुमारे चार हजार सत्रे केली आहेत. म्हणजेच चार वर्षात शोजी 2.84 लाख अमेरिकिन डॉलर कमावले आहेत.
मोरिमोटो दिसायला अतिशय बारिक आहे. ट्विटरवर त्याचे सुमारे अडीच लाख फॉलोअर्स आहेत. बहुतेक ग्राहक येथे त्यांच्याशी संपर्क साधतात. काहीही करत नाही याचा अर्थ मोरिमोटो काहीही करेल असे नाही. त्याने कंबोडियाला जाण्याच्या ऑफरही नाकारल्या होत्या. याशिवाय शारीरिक संबंध ठेवण्यासारख्या विनंत्याही त्याने फेटाळल्या आहेत.
गेल्या आठवड्यात त्याने २७ वर्षीय डेटा विश्लेषक अरुणा चिडासोबत वेळ घालवला होता. या दरम्यान दोघांनी चहा प्यायला आणि केक खाल्ला, पण ती फार कमी बोलत होती. चिदाला सार्वजनिक ठिकाणी भारतीय पोशाख घालायचा होता, पण तिला तिच्या मित्रांना ते आवडणार नाही याची काळजी वाटत होती. म्हणून तिने मोरिमोटोची मदत घेतली.
मोरिमोटो यांनी यापूर्वी प्रकाशकांसाठीही काम केले होते. या कामात त्याला अनेकदा काही केले नाही म्हणून खडसावले आहे. आता हेच मोरिमोटोचे उत्पन्नाचे एकमेव साधन आहे. त्यांची पत्नी आणि मुलेही त्याला पाठिंबा देतात. मात्र, तो किती कमावतो हे सांगण्यास त्याने नकार दिला. तो म्हणाला की तो एका दिवसात फक्त एक किंवा दोन ग्राहकांना वेळ देतो. कोरोनापूर्वी याची संख्या 3 ते 4 च्या आसपास होती.