Flight Booking Offer: मागील काही महिन्यांमध्ये विमान प्रवास लक्षणी फरकानं महाग झाला आहे. आंतरदेशीय, आंतराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवास तिकीटांच्या (Air Tickets) दरांनी उसळी मारली आहे. जेट फ्यूल (Jet Fuel) अर्थात विमानात वापरल्या जाणाऱ्या इंधनाच्या दरात वाढ झाल्यामुळं तिकीटाचे दरही वाढल्याचं सांगण्यात येत आहे.
(Flight) विमान प्रवास कितीही महागला असला, तरीही सातत्यानं या मार्गानं प्रवास करणारे काही विमानानं प्रवास करणं थांबवत नाहीत. अशा परिस्थितीत कमी दरात तिकीट कुठे आणि कसं मिळेल यासाठी बहुविध मार्ग अवलंबले जातात.
तुम्हीही विमान तिकीट बुक करू पाहत असाल आणि त्यावर असणाऱ्या ऑफर्सची (Offers) तुम्हाला कल्पना नसेल, तर ही बातमी अतिशय महत्त्वाची. काही असेही मार्ग आहेत जिथून तुम्हाला कमी दजरात विमान प्रवास करणं शक्य होईल.
विविध वेबसाईट्स (Flight Ticket Booking websites)
विमान प्रवास करण्यासाठी तिकीट बुकींगची सुविधा बऱ्याच वेबसाईट्सकडून दिली जाते. (Credit card, debit card, credit score) क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, क्रेडिट स्कोअर अशा अनेक निकषांच्या आधारे तुमच्यासाठी काही ऑफर्सही सादर करता येतात. त्यामुळं विमान तिकीट Booking पूर्वी एकाहून अधिक वेबसाईट्सवर सर्वप्रथम दरांचा आढावा घ्यावा.
क्रॉम प्लग-इन (Chrome Plug-In)
गुगल क्रोमवर (Google chrome) काही थर्ड पार्टी प्लग इन असतात. जे विमानांच्या तिकीट किंमतीवर नजर ठेवून असतात. त्यांच्याचमुळे तुम्हाला दर कमी झाल्यास लगेचच नोटिफिकेशन येतं. इथं भाडं Compare करण्याचीही सुविधा असते.
गुगल एक्सप्लोरर (Google Explorer)
गुगल एक्सप्लोररच्या माध्यमातून तुम्ही फक्त ट्रीप प्लान करु शकत नाही, तर तिकीट दर कमी झाल्यास त्याची माहितीही तुम्हाला इथे मिळते.
कोणत्या वेळेत करावं Flight Booking ?
प्रवास करण्यासाठी कोणत्याची ठराविक वेळेची मर्यादा नसेल तर, तुम्ही दिवसभरासाठी विमान प्रवासाच्या दरांवर नजर ठेवू शकता. दिवसातून बऱ्याचदा हे दर बदलतात. त्यामुळं या माध्यमातूनही तुम्ही नवनवीन ऑफर्सवर नजर टाकू शकता.
ब्राऊजरच्या कुकीज (Cookies) हटवा
तुम्ही एखादी गोष्ट किंवा समजा विमानाचं तिकीट बुक करत आहात तर, त्यावेळी सर्व माहिती डिजीटल ट्रॅकर म्हणजेच कुकीजमध्ये साठवली जाते. तुम्ही पुन्हा अशाच तिकीट बुकींगसाठी गेल्यास तिथं मात्र दर वाढलेले दिसतात. असं होऊ न देण्यासाठी सर्वप्रथम ब्राऊजिंग झाल्यानंतर कुकीज डिलीट करा. इनकॉग्निटो मोड (Incognito Mode) मध्ये सर्च केल्यास कुकीज स्टोअर होण्याची चिंता उरणार नाही.