मुंबई : ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट अमेझॉनचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैंकी एक असलेले जेफ बेजोस यांना आपली संपत्ती दान करण्याची इच्छा आहे. पण, ही संपत्ती कुठे दान करावी? असा प्रश्न त्यांना सध्या पडलाय.
या प्रश्नाचं उत्तर शोधून काढण्यासाठी त्यांनी सोशल वेबसाईटचा आधार घेतलाय. 'ट्विटर'वर त्यांनी आपली अब्जावधींची संपत्ती कुठे दान करू? असा प्रश्नच त्यांनी मांडलाय.
जवळपास ५.३ लाख करोड रुपयांची संपत्ती बेजोस यांच्या नावावर आहे. 'मला आता लोकांची मदत करण्याची इच्छा आहे. अशी मदत ज्याची गरज तात्काळ आणि खोल परिणाम असेल...' असं त्यांनी ट्विटरवर म्हटलंय. इतकंच नाही तर 'जर तुमच्याकडे एखादी कल्पना असेल तर ट्विटला रिप्लाय करून तुमची कल्पना नक्की कळवा' असं म्हणत त्यांनी ट्विटर वासियांकडे मदतही मागितलीय.
Request for ideas… pic.twitter.com/j6D68mhseL
— Jeff Bezos (@JeffBezos) June 15, 2017
यानंतर, त्यांच्या या ट्विटला २४ तासांच्या आता त्यांना १५,००० हून अधिक रिल्पाय मिळालेत. उल्लेखनीय म्हणजे, जेफ दरवर्षी आपल्या संपत्तीचा काही हिस्सा दान करतात. त्यांच्या आई-वडिलांनी स्थापन केलेल्या एका फाउंडेशनला ते मदत करतात तसंच एका कँसर सेंटरलाही त्यांनी ४० मिलियन डॉलर दान म्हणून दिलेत.
जगभरातील १६७ लोकांनी आपल्या एकूण संपत्तीचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग दान करण्याची इच्छा व्यक्त केलीय. यामध्ये सर्वात श्रीमंत असलेल्या बिल गेटस यांच्यासोबत फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग यांचाही समावेश आहे.