Trivikram Dholtasha Pathak : 1 मे (#1stMay) हा दिवस महाराष्ट्रासाठी खूप खास आहे. याच दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना (Maharashtra Day) झाली होती. या दिवसाला जगभरात आंतरराष्ट्रीय कामगार दिन (International Workers Day) म्हणून साजरा केला जातो. अठराव्या शतकात झालेल्या कामगार चळवळीच्या (Kamgar Din) गौरवासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. जगभरात हा दिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. (Maharashtra Din in marathi)
सातासमुद्रपार असलेल्या मराठी माणूसदेखील वेगवेगळ्या पद्धतीने महाराष्ट्र दिन साजरा करतो. आखाती देशातील पहिले आणि एकमेव पारंपारिक ढोल ताशा पथक त्रिविक्रम ढोल ताशा (Dubai) यांनी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने एक आगळा वेगळा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. (Maharashtra Day by playing Dhol Tasha Lezhim on Luxury Yacht in Persian Sea )
महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी त्यांनी चक्क एक लक्झरी योटवर, पर्शियन गल्फ या समुद्रात जगातील एकमेव 7 स्टार हॉटेल 'बुर्ज अल अरब' याच्यासमोर पाण्यात ढोल ताशाचं वादन केलं. पथकाचे संस्थापक सागर पाटील यांच्या डोक्यातून ही आगळी वेगळी संकल्पना समोर आली.
या उपक्रमात पथकातील 20 वादकांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे यात महिलांचाही समावेश होता. ही योट दुबई मरीनामधून वादकांना घेऊन निघाली आणि वाटेत Dubai Eye Giant Wheel समोरून वादन करीत बुर्ज अल अरब या हॉटेलच्या समोर थांबली. या ठिकाणी ढोल ताशाचे वादन करून या पथकाने परतीचा प्रवास केला.
ही धाडसी कल्पनेबद्दल सागर पाटील म्हणतात की, ''महाराष्ट्राची कला आणि संस्कृती परदेशात राहुन जपण्याचे आणि त्याचा प्रचार करण्याचं काम आम्ही गेली पाच वर्ष करतच आहोत. पण यावर्षी काहीतरी वेगळे करण्याच्या हेतूने ही संकल्पना आखली. आजवर कधीही, कोणीही असं वादन केलेलं नाही, आणि हेच औचित्य साधून आम्ही हा रेकॉर्ड बनवला आहे.'' (Maharashtra Day by playing Dhol Tasha Lezhim on Luxury Yacht in Persian Sea Trivikram Dhol Tasha Pathak Dubai world record)
या पथकाची स्थापना सागर पाटील यांनी 2017 साली केली आहे. त्यावेळी पथकाची सुरुवात तीन वादकांपासून झाली आणि आज त्यांच्या पथकामध्ये 150 हून अधिक कलाकार आहेत. दरवर्षी साधारण 25 ते 30 वादन करणार हे पथक, आपल्या सादरीकरणातून नेहमीच महाराष्ट्राची कला आणि संस्कृतीचं उत्तम प्रदर्शन आंतरराष्ट्रीय पातळीवर जगासमोर मांडत असतात.
असा हा विक्रम करून दुबईच नव्हे तर जगभरातील सर्व महाराष्ट्रीय लोकांना त्रिविक्रम ढोल तशा पथकाने महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्या दिल्या. विशेष म्हणजे 2021 डिसेंबरमध्ये त्रिविक्रम ढोल तशा पथकाचं संस्थापक सागर पाटील ह्यांना महाराष्ट्र शासनाकडून "मराठी भाषा सम्मान" पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.