यूरोप : गुगल आणि अॅपल या दोन कंपन्यांचा जगभरात दबदबा आहे. या दोघांनी बनविलेल्या टेक्नोलॉजीचा वापर जगभरात सर्रास होतोय. या सर्वामूळे त्यांची स्व:ताची धमक बाळगून असतात. पण या दोन्ही कंपन्याना वेठीस धरण्याची धमक असणारीही एक महिला आहे.
युरोपियन युनियनची अँटीट्रस्ट केस चालविणाऱ्या मार्गारेट वेस्टगर यांनी काही दिवसांपूर्वी गुगल आणि अॅपल दोघांनाही अरबो रुपयांचा दंड भरण्यास भाग पाडले आहे.जगभरातील मोठ्या संस्था आणि सरकार यांच्यामध्ये मार्गारेट सध्या चर्चेचा विषय बनल्या आहेत. या वर्षी जून मध्ये त्यांनी गुगलला २.४ अब्ज युरोचा दंड भरण्यास भाग पाडले होते. गुगल सर्च आपल्या रिझल्टमध्ये चुकिच्या पद्धतीने शॉपिंग सर्व्हिस प्रमोट करत आहे असा आरोप तिने केला. त्यानंतर गुगलने युरोपियन कोर्टात पुन्हा अपील केले आहे.
याच्या काही दिवस आधी वेस्टेगर यांनी अॅपलवर आयरलॅंडमध्ये टॅक्स चोरीच्या कारणाने १३ अरब यूरोंचा दंड भरण्यास भाग पाडले होते.विशेष बाब म्हणजे मार्गारेट ह्या वकील नाहीएत. अॅण्टीट्र्स्ट प्रकरणांमध्ये वकिल नसण्याचा सर्वात फायदा मिळतो. त्यामूळे मी खूप चांगल्या आणि वेगळ्या पद्धतीने विचार करु शकते असे त्या सांगतात. मार्गारेट यांची कथा डेन्मार्कच्या एका टीव्ही मालिकेत दाखविली गेली होती.