मुंबई : इंटरनेट सेन्सेशन एम्मा चेंबरलेन (Emma Chamberlain) आपल्या हटके लूकसाठी नेहमीच चर्चेत असते. नुकत्याच पार पडलेल्या २०२२ च्या मेट गाला इव्हेंटमध्ये (Met Gala 2022) सुद्धा तिच्याच लुक्सची चर्चा होती. या इव्हेंटमध्ये तिने ऐतिहासिक डायमंड नेकपीस घातला होता. या तिच्या नेकपीसची खुप चर्चा रंगली होती. मात्र आता तिच्या या नेकपीसवर भारतीय संतापले आहेत.
एम्मा चेंबरलेनवर (Emma Chamberlain) चोरीचा आरोप केला जातोय. मात्र यावर अद्याप एम्मा चेंबरलेनची अधिकृत प्रतिक्रिया समोर आली नाही. त्यामुळे तिच्यावर लावण्यात आलेले आरोप खरे की खोटे आहेत ? हे अद्याप कळू शकले नाहीये.
मेट गाला २०२२ इव्हेंटमध्ये (Met Gala 2022) सर्वच सेलिब्रिटी सहभागी होतं असतात. एम्मा चेंबरलेन यंदाच्या इव्हेंटमध्ये लूक्समुळे चर्चेत आली होती. एम्मा व्हिटॉनच्या पोशाखात दिसली. फुल स्लीव्ह क्रॉप टॉप आणि पांढऱ्या स्कर्टमध्ये एम्मा खूपच सुंदर दिसत होती. यासोबत तिने गळ्यात सुंदर नेकपीस घातला होता.
मेट गाला इव्हेंटमधील फोटो सोशल मीडियावरही शेअर झाले होते. या फोटोवर अनेकांनी तिच्या लुक्सची प्रशंसा केली तर अनेकांनी ट्रोलही केलं. विशेष म्हणजे यात भारतातील नेटकऱ्याकडून संताप व्यक्त केला.
एका भारतीय युजरने एम्माने घातलेला नेकपीस भारतातून चोरी केल्याचा आरोप केला. दुसऱ्या युजरने, ‘हे पटियालाच्या महाराजांचे दागिने आहेत. भारतीय इतिहासातील हा चोरीला गेलेला दागिना आहे, सेलिब्रिटींना दिलेला फॅन्सी पीस नाही. तिसऱ्या युजरने, ‘जेव्हा चोरीचे सामान जागतिक मंचावर दाखवले जाते.’असे कमेंट केले आहे.
Thanks #cartier. Those are the jewels of the Maharaja of Patiala. That’s a piece of India’s stolen history, not a fancy piece of jewellery to lend out to celebrities. Disrespectful on so many levels. pic.twitter.com/KhK5LPexaj
— Shriya Zamindar (@shriyazamindar) May 7, 2022
भारतीयांचा दावा काय ?
एम्माने (Emma Chamberlain) घातलेला नेकपीस महाराजा पटियाला (Maharaja Patiala) भूपिंदर सिंग यांचा नोबल चोकरपीस होता.
पटियालाच्या महाराजांकडे डी बीमर्स हा जगातील सातवा सर्वात मोठा हिरा होता, जो त्यांच्या हाराच्या मध्यभागी ठेवण्यात आला होता. कार्टियर या प्रसिद्ध कंपनीकडून त्यांनी तो विकत घेतला होता.१९२८ मध्ये महाराजांनी कंपनीला हार बनवण्याचे काम दिले होते, असा दावा केला जातो. १९४८ मध्ये महाराजांचा मुलगा यादविंदर सिंग याने तो हार घातल्यानंतर अचानक गायब झाला.
लंडनमधील कार्टियर प्रतिनिधी एरिक नुसबॉम यांनी ५० वर्षांनंतर हार परत मिळवला. त्यावेळी, हारात डी बिअरचे स्टोन्स आणि बर्मी माणिक नव्हते. त्यामुळे कार्टियरने डी बीमर्स आणि इतर मूळ रत्नांशिवाय हा नेकपीस पुन्हा बनवण्याची योजना आखली.
दरम्यान सोशल मीडियावर एम्माच्या लूकपेक्षा तिने चोरीचा नेकलेस घातल्याची चर्चा जास्त रंगली आहे. त्यामुळे एम्मा सोशल मीडियावर ट्रोल होतेय.